“माझ्या खासगी आयुष्याबद्दल..”; अनन्या पांडेसोबतच्या ब्रेकअपच्या चर्चांदरम्यान आदित्यचं वक्तव्य चर्चेत

“माझ्या खासगी आयुष्याबद्दल..”; अनन्या पांडेसोबतच्या ब्रेकअपच्या चर्चांदरम्यान आदित्यचं वक्तव्य चर्चेत

गेल्या काही दिवसांपासून अभिनेत्री अनन्या पांडे आणि अभिनेता आदित्य रॉय कपूर यांच्या ब्रेकअपच्या चर्चांना उधाण आलं आहे. यादरम्यान नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत आदित्य त्याच्या खासगी आयुष्याविषयी बोलणं का टाळतो, याचं उत्तर दिलं आहे. अनन्या आणि आदित्य हे गेल्या दोन वर्षांपासून एकमेकांना डेट करत होते. या दोघांना अनेक पार्ट्यांमध्ये एकत्र पाहिलं गेलं. इतकंच नव्हे तर परदेशात जेव्हा दोघं फिरायला गेले होते, तेव्हा तिथलेही काही फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. मात्र आदित्य कधीच त्याच्या नात्याविषयी माध्यमांसमोर मोकळेपणे व्यक्त झाला नाही. यामागचं कारणही त्याने सांगितलं आहे.

‘लाइफस्टाइल आशिया इंडिया’ला दिलेल्या मुलाखतीत तो म्हणाला, “माझ्या मते मी माझ्या खासगी आयुष्याविषयी नेहमीच गप्प राहिलो. मला तसंच राहायला आवडतं. लोकांनी माझ्याबद्दल किंवा माझ्या खासगी आयुष्याबद्दल जाणून घ्यावं, अशी कधी मला गरजच वाटली नाही. म्हणूनच मी काही गोष्टी माझ्यापुरत्याच ठेवतो. मला सर्वकाही व्यक्त केलेलं आवडत नाही. मला ज्या फालतू गोष्टींची गरज नाही, त्यात मी माझा वेळ का वाया घालवू? त्याने माझा काहीच फायदा होणार नाही. हल्ली लोकांना प्रत्येक गोष्टीविषयी आपलं मत मांडायचं असतं. आपण मत मांडणं खूप गरजेचं आहे, असं त्यांना वाटतं. त्यांना प्रत्येक गोष्टीविषयी काही ना काही बोलायचं असतं.”

 

View this post on Instagram

 

A post shared by Scott Eyewear (@scotteyewear)

आदित्य रॉय कपूरचा चाहतावर्ग मोठा असला तरी सोशल मीडियावर तो फारसा सक्रिय नसतो. फक्त त्याच्या चित्रपट आणि जाहिरातींविषयीचे पोस्ट तो शेअर करत असतो. “माझ्या मते मी सोशल मीडियावर फार सक्रिय नसल्याने लोक माझ्याबद्दल काय म्हणत असतील याने मला काही फरक पडत नाही. समाजात असे अनेक लोक असतात, ज्यांना तुम्ही आवडता किंवा आवडत नाहीत. त्यामुळे तो प्रत्येकजण काय म्हणतोय, याकडे लक्ष देण्यात काही अर्थ नाही. त्यामुळे माझ्या पोस्टवर लोक काय कमेंट करतात, हेसुद्धा मी पाहत नाही.”

गेल्या वर्षी अनन्या पांडेनं जेव्हा ‘कॉफी विथ करण’ या चॅट शोमध्ये हजेरी लावली होती, तेव्हा तिने अप्रत्यक्षपणे आदित्यसोबत रिलेशनशिपमध्ये असल्याची कबुली दिली होती. अनन्या आणि आदित्य 2022 पासून एकमेकांना डेट करत होते. यावर्षी मे महिन्यात दोघांनी ब्रेकअप केल्याची चर्चा आहे. या ब्रेकअपच्या चर्चांदरम्यान आदित्यला अभिनेत्री सारा अली खानसोबत एका पार्टीमध्ये पाहिलं गेलं.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;