Sex Scandle Case : प्रज्वल रेवण्णा तपास समितीला देतोय उडवाउडवीची उत्तरं

Sex Scandle Case : प्रज्वल रेवण्णा तपास समितीला देतोय उडवाउडवीची उत्तरं

देशभरात खळबळ उडवून देणाऱया कर्नाटकातील सेक्स स्कँडलमधील मुख्य आरोपी जेडीएसचा खासदार प्रज्वल रेवण्णाची सध्या विशेष तपास समितीकडून चौकशी करण्यात य़ेत आहे. दरम्यान या चौकशीबाबत एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. प्रज्वल रेवण्णा तपासात सहकार्य करत नसून तो उडवाउडवीची उत्तरं देत असल्याचे समोर आले आहे. प्रज्वल रेवण्णा हा त्याने काहीही केले नसल्याचे सांगत असून त्याला या प्रकरणात गोवले गेल्याचा दावा त्याने केला आहे.

हसनचा खासदार आणि एच. डी. देवेगौडा यांचा नातू असलेल्या प्रज्वलने जेडीएस-भाजप युतीचे उमेदवार म्हणून यंदाची निवडणूक लढवली आहे. मतदानानंतर प्रज्वलचे अनेक सेक्स स्कँडलचे व्हिडीओ व्हायरल झाले. त्यानंतर दुसऱयाच दिवशी तो देशातून परागंदा झाला होता. तो जर्मनीला निघून गेल्याचे कळल्यावर त्याच्या ठावठिकाण्यासाठी इंटरपोलमार्फत लुकआऊट नोटीसही जारी करण्यात आली होती. त्याचा अटकपूर्व जामीन अर्जही फेटाळण्यात आला होता.

31 मे रोजी प्रज्वल बंगळुरूत परतला. बंगुळूरूच्या केम्पेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळावरून अटक करण्यात आली. त्यानंतर त्याला न्यायालयात हजर करण्यात आले असता न्यायालयाने ६ जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;