T20 WC 2024 : वर्ल्डकपची धमाकेदार सुरुवात; यजमान अमेरिकेने कॅनडाचा धूळ चारली, जोन्सची झंझावती खेळी

 

आयसीसी टी20 वर्ल्डकपची धमाकेदार सुरुवात झाली आहे. पहिला सामना यजमान अमेरिका आणि कॅनडा संघात खेळला गेला. यात यजमान संघाने 7 विकेट्सनी विजय मिळवला. डलासच्या ग्रँड प्रेयरी मैदानात झालेल्या या सामन्यात कॅनडाने अमेरिका समोर विजयासाठी 195 धावांचे आव्हान ठेवले होते. हे आव्हान लीलया पार करत अमेरिकेनं 17.4 षटकात 197 धावा करत विजय मिळवला.

आरोन जोन्स अमेरिकेच्या विजयाचा नायक ठरला. त्याने तुफानी खेळी करत कॅनडाच्या गोलंदाजांची धुलाई केली. आरोन जोन्स याने 40 चेंडूत नाबाद 94 धावा केल्या. या त्याच्या 4 चौकरांचा आणि 10 उत्तुंग षटकारांचा समावेश आहे. जोन्स आणि एंड्रीज गौस या जोडीने तिसऱ्या विकेटसाठी 131 धावांनी भागीदारी करत संघाला विजयी केले. अमेरिकेच्या टी20 क्रिकेट इतिहासातील ही सर्वात मोठी भागीदारी ठरली. गौस याने 7 चौकर आणि तीन षटकारांच्या मदतीने 65 धावा केल्या.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;