तुम्ही खूश रहाल तर तुरुंगात मी देखील खूश राहीन, केजरीवाल यांचे जनतेला भावनिक आवाहन

तुम्ही खूश रहाल तर तुरुंगात मी देखील खूश राहीन, केजरीवाल यांचे जनतेला भावनिक आवाहन

दिल्लीचे मुख्यमंत्री, ‘आप’चे नेते अरविंद केजरीवाल हे रविवारी दुपारी तिहार तुरुंगात परतणार आहेत. तुरुंगात परतण्याआधी त्यांनी एक ट्विट करत त्यांचा आजचा दिनक्रम सांगितला असून त्यात त्यांनी दिल्लीतील जनतेला एक भावनिक आवाहन केले आहे.

”मी सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर 21 दिवस प्रचारासाठी तुरुंगाबाहेर आलो होतो. त्यासाठी सर्वोच्च न्यायालयाचे खूप खूप आभार. आज मी तिहार तुरुंगात परतणार आहे. दुपारी तीन वाजता घरातून निघेन. तिथून राजघाटावर जाऊन महात्मा गांधी यांना श्रद्धांजली वाहेन. तिथून कॅनोट प्लेस येथील हनुमान मंदिरात जाऊन भगवान हनुमानाचे आशीर्वाद घेईन. त्यानंतर पक्षकार्यालयात जाऊन सर्व कार्यकर्ते व पक्षाच्या नेत्यांची भेट घेऊन मग मी तिहारसाठी रवाना होईन, असे अरविंद केजरीवाल यांनी ट्विट केले आहे.

या ट्विटसोबतच त्यांनी दिल्लीतील जनतेला एक भावनिक आवाहन देखील केले आहे. ”तुम्ही सर्व स्वत:ची काळजी घ्या. तुरुंगात मला तुमच्या सर्वांची चिंता राहील.. तुम्ही खूश रहाल तर तुमचा केजरीवाल देखील तुरुंगात खूश राहील.. जय हिंद”, असे आवाहन केजरीवाल यांनी या ट्विटमधून केले आहे.

कथित उत्पादन शुल्क गैरव्यवहार प्रकरणात ईडीने 21 मार्चला केजरीवाल यांना अटक केली होती. त्यानंतर 10 मे रोजी सर्वोच्च न्यायालयाने त्यांना लोकसभा निवडणूक प्रचारासाठी 21 दिवसांचा अंतरिम जामीन मंजूर केला होता. मात्र प्रचारादरम्यान त्यांना काही गंभीर आजाराची लक्षणे दिसली. त्या पार्श्वभूमीवर वैद्यकीय तपासण्यांसाठी अंतरिम जामिनाची मुदत सात दिवसांनी वाढवण्याची विनंती त्यांनी केली. त्यांच्या अर्जावर शनिवारी ईडीतर्फे अतिरिक्त सॉलिसिटर जनरल एस. व्ही. राजू यांनी आक्षेप घेतला. केजरीवाल यांच्यातर्फे अॅड. एन. हरिहरन यांनी जोरदार बाजू मांडली.

दोन्हीकडील युक्तिवाद पूर्ण झाल्यानंतर न्यायाधीश कावेरी बावेजा यांनी जामीनाचा निर्णय 5 जूनला देणार असल्याचे स्पष्ट केले. तोपर्यंत तात्पुरता दिलासा नाकारल्यामुळे केजरीवाल यांना रविवारीच तिहार तुरुंगात जावे लागणार आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;