प्रधानमंत्री साधनेला बसले आणि सूर्यदेवता शांत झाले; रवी किशनने तोडले अकलेचे तारे

प्रधानमंत्री साधनेला बसले आणि सूर्यदेवता शांत झाले; रवी किशनने तोडले अकलेचे तारे

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे तीन दिवस कन्याकुमारी येथील स्वामी विवेकानंद मेमोरियल येथे ध्यानधारणेसाठी गेले होते. त्यांच्या या ध्यानधारणेचे वेगवेगळ्या अँगलमधून फोटो शेअर करण्यात आले आहेत. भाजप नेते त्यांच्या या ध्यानधारणेचे कौतुक करताना थकत नाहीएत. अशातच भाजप उमेदवार रवी किशन यांनी मोदींची स्तुती करताना अकलेचे तारे तोडले आहेत.

लोकसभा निवडणूकीचे अंतिम टप्प्याचे मतदान शनिवारी देशभरात पार पडले. उत्तर प्रदेशमध्ये देखील काही जागांवर सातव्या टप्प्यात मतदान पार पडले. यात रवि किशन यांचा मतदारसंघ असलेल्या गोरखपूरमध्ये देखील शनिवारी मतदान पार पडले. गोरखपूरचे खासदार असलेले रवी किशन यांनी पहिल्यांदाच गोरखपूरमधून मतदान केलं. त्याविषयी त्यांची प्रतिक्रीया विचारली. त्याबाबत बोलताना रवी किशन यांनी विचित्र वक्तव्य केलं आहे.

”पहिल्यांदा गोरखपूरमध्ये मतदान करून खूप मस्त वाटत आहे. ऐतिहासिक वाटत आहे. सध्या वातावरण देखील एकदम मस्त झाले. मोदीजी ध्यानधारणा करत आहेत. त्यामुळे सुर्यदेवता देखील शांत झाला आहे. हे ऐतिहासिक आहे. भीषण गरमीत थंड वाटू लागले आहे. हे रामराज्याचे संकेत आहेत. तिसऱ्यांदा प्रधानमंत्री मोदीजी विराट रुपात येणार आहेत”, असे वक्तव्य रवी किशन यांनी केले आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;