Ranbir Kapoor : दीपिकाची ‘ती’ गोष्ट खटकायची, रणबीरने सांगितलं अननोन सिक्रेट
बॉलिवूडमधील अनेक स्टार्सच्या जोड्या लोकप्रिय आहेत. त्यातील काही आजही एकत्र आहेत, पण काहींचं नात मध्येच तुटलं. आता जरी त्यांनी मूव्ह ऑन केलं असलं तरी त्यांच्या चाहत्यांच्या मनात तर कायम हळहळ राहीलच. असंच एक लोकप्रिय जोडपं होतं ते म्हणजे अभिनेता रणबीर कपूर आणि दीपिका पडूकोण. आता जरी ते एकमेकांसोबत नसले, आयु्ष्यात पुढे गेले असले तरी एक काळ असा होता जेव्हा ते एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडाले होते. ‘बचना ए हसीनों’ चित्रपटाचे शूटिंग करताना ते एकमेकांच्या जवळ आले. पण दुर्दैवाने त्यांच नातं फार काळ टिकू शकलं नाही. रणबीर आणि दीपिकाने ये जवानी है दिवानी, तमाशा अशा अनेक चित्रपटात एकत्र काम केलं. त्यांची ऑनस्क्री केमिस्ट्री चाहत्यांना खूपच आवडली होती. एकत्र असताना दीपिका रणबीरच्या प्रेमात एवढी बुडाली होती की तिने तिच्या मानेवर रणबीरच्या नावाचे टॅटूही काढून घेतला होता.
दीपिकाची ती गोष्ट खूप खटकते..
काही वर्षांपूर्वी रणबीरने एक मुलाखत दिली होती, त्यामध्ये त्याला एक प्रश्न विचारण्यात आला होता. दीपिकाची कोणती गोष्ट तुला खटकते, असा सवाल त्याला विचारण्यात आला होता. तेव्हा ‘ॲनिमल’स्टारने त्यावर मोकळेपणने उत्तर दिलं. तिची ( दीपिका) फ्लर्ट करण्याची सवय मला आवडायची नाही. ‘ तिचं फ्लर्ट करणं, ती खूप जास्त काम करते आणि त्या कामात स्वत:ला अक्षरश: झोकून देते. तसं करायला नको. तिने जास्तीत जास्त सुट्ट्या आणि ब्रेक घ्यायला पाहिजे. स्वत:ला थोडं रिझर्व्ह ठेवलं पाहिजे. आता तिने असं वागणं सुरू केलं आहे’ असं रणबीर म्हणाला.
दीपिकाला काय खटकलं?
त्यानंतर सेम हाच प्रश्न दीपिकालाही रणबीरबद्दल विचारण्यात आला. त्या”वर उत्तर देताना दीपिका म्हणाली की त्याच्या जेवढ्या न आवडणाऱ्या, खटकणाऱ्या गोष्टी आहेत त्यापेक्षा अधिक आवडणाऱ्या गोष्टी आहेत. ‘ तो लोकांचा खूप आदर राखतो. त्याला त्याची स्पष्ट मतं आहेत, त्यामुळे इतर लोक आणि परिस्थितीमुळे तो प्रभावित होत नाही. त्याच्यावर परिणाम होत नाही. एखाद्या गोष्टीपासून तो स्वत:ला दूर ठेवू शकतो.’ असं दीपिकाने सांगितलं. ‘
आयुष्यात केलं मूव्ह ऑन
दीपिका पडूकोणपासून वेगळं झाल्यानंतर रणबीर कपूरचं नाव अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं. पण आता त्याने मूव्ह ऑन केलंय. 2022 साली त्याने अभिनेत्री आलिया भट्टशी लग्न केलं , त्या दोघांना राहा नावीच एक गोड मुलगी देखील आहे. तर दीपिका पडूकोणबद्दल सांगायचं झाल्याल तिने 2018 साली रणवीर सिंगशी लग्न केलं. सध्या ती प्रेग्नन्सी एन्जॉय करत असून लवकरच गुड न्यूज देणार आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List