विनाकारण शेपटीवर पाय देणाऱ्यांना सोडायचे नाही, मेधा कुलकर्णींची अमोल मिटकरींना डिवचलं

विनाकारण शेपटीवर पाय देणाऱ्यांना सोडायचे नाही, मेधा कुलकर्णींची अमोल मिटकरींना डिवचलं

भाजप, मिंधे गट व अजित पवार गटाने गद्दारी करून सरकार स्थापन केले असले तरी त्यांच्या नेत्यांमधील धुसफूस अनेकदा चव्हाट्यावर येत असते. नुकतंच एका कार्यक्रमात भाजपच्या मेधा कुलकर्णी यांनी अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरींवर निशाणा साधला. ”पुरोहितांची, मंत्रांची चेष्टा करणाऱ्या व्यक्तीसोबत मी स्टेजवर बसणार नाही. तशी ठाम भूमिका मी घेतली होती, असे मेधा कुलकर्णी यांनी एका कार्यक्रमात बोलताना सांगितले.

सांगली येथे ब्राह्मण समाज संघटनेतर्फे आयोजित एका कार्यक्रमात बोलताना मेधा कुलकर्णी यांनी अमोल मिटकरींना डिवचलं आहे. ”ब्राह्मण समाज अतिशय साधा समाज आहे. मात्र विनाकारण जर कुणी आपल्या शेपटीवर पाय देत असेल तर त्याला सोडायचं नाही. मध्यंतरी बारामती येथील एका कार्यक्रमात अमोल मिटकरी येणार होते. मिटकरींनी पुरोहितांची, आपल्या मंत्रांची चेष्ठा केली होती. ते येणार आहे हे समजल्यावर मी त्यांच्यासोबत स्टेजवर बसणार नाही अशी ठाम भूमिका घेतली होती”, असे मेधा कुलकर्णी यांनी सांगितले. त्यामुळे जे चुकीचे आहे, त्याला चुकीचे म्हणा, असेही मेधा कुलकर्णी यांनी यावेळी आवर्जून सांगितले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;