सलमान खानच्या अभिनेत्रीसोबत लग्न करणार शिव ठाकरे? मोठी माहिती समोर

सलमान खानच्या अभिनेत्रीसोबत लग्न करणार शिव ठाकरे? मोठी माहिती समोर

अभिनेता शिव ठाकरे याला आज कोणत्याचं ओळखीची गरज नाही. अभिनेता आता त्याच्या खासगी आणि प्रोफेशनल आयुष्यामुळे चर्चेत असतो. आता देखील अभिनेता खासगी आयुष्यामुळे चर्चेत आहे. शिव ठाकरे अभिनेता सलमान खान याची अभिनेत्री डेजी शाह हिच्यासोबत लग्न करणार असल्याच्या चर्चांनी जोर धरला आहे. गेल्या काही दिवसांपासून शिव ठाकरे आणि डेजी शाह यांच्या रिलेशनशिपची चर्चा रंगली आहे. रिलेशिपच्या रंगलेल्या चर्चांवर आणि लग्नाच्या चर्चांवर डेजी हिने मौन सोडलं आहे.

नुकताच झालेल्या एका मुलाखतीत अभिनेत्री म्हणाली, ‘आतापर्यंत रिलेशनशिपच्या चर्चा रंगत होत्या. पण आता लग्नाच्या चर्चांनी देखील जोर धरला आहे. शिव आणि माझ्यामध्ये काहीही नाही. आम्ही फक्त चांगले मित्र आहोत. एक वेळ अशी होती जेव्हा मी इंडस्ट्रीमध्ये नवीन होती आणि मला काहीही माहिती नव्हतं. कोणीतरी माझा हात पकडला आणि मला मार्ग दाखवला…’

‘शिव याला पहिल्यांदा भेटली. त्याने अनेक रिऍलिटी शोमध्ये काम केलं आहे. ज्यामुळे त्याचा अनुभव देखील फार मोठा आहे. शिव कायम मला सल्ले देत असतो. मी सिनेमांमध्ये काम केलंय, त्यामुळे सिनेमांचा अनुभव मला आहे. मी शिव याला सिनेमांबद्दल सांगत असते.’

 

 

View this post on Instagram

 

A post shared by Daisy (@shahdaisy)

शिव याच्यासोबत असलेल्या नात्यावर अभिनेत्री म्हणाली, ‘आमच्या दोघांमध्ये फार घट्ट नातं आहे. त्यामुळे आम्ही कायम एकमेकांसोबत बोलत असतो. जेव्हा तुम्ही कोणत्या मुलासोबत अधिक बोलता तेव्हा दोघे रिलेशनशिपमध्ये असतील.. अशी चर्चा रंगलेली असते.’

स्वतःच्या लव्हलाईफबद्दल देखली डेजी हिने मोठा खुलासा केला. ‘माझी फसवणूक झाली आहे. जो मला सतत अटेन्शन देईल असा जोडीदार मला हवा आहे. पण कधी मला अन्टेशन हवं असतं, तर मला कधी अन्टेशनची गरज नसते. सर्वात आधी मला स्वतःला समजून घेण्यची गरज आहे…’ असं देखील अभिनेत्री म्हणाली.

डेजी शाह हिच्याबद्दल सांगायचं झालंतर, अभिनेत्री सलमान खान याच्यासोबत ‘जय हो’ सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. ‘जय हो’ सिनेमानंतर देखील डेजीने अनेक सिनेमांमध्ये काम केलं. पण अभिनेत्रीला बॉलिवूडमध्ये स्वतःची ओळख निर्माण करता आली नाही.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;