20 हजाराची लाच घेताना केजच्या तहसीलदारासह कोतवालावर गुन्हा दाखल

20 हजाराची लाच घेताना केजच्या तहसीलदारासह कोतवालावर गुन्हा दाखल

केज तहसील कार्यालयातील पुरवठा विभागांतर्गत आरोप असलेल्या एका धान्य दुकानावरची कारवाई टाळण्यासाठी कोतवालामार्फत 40 हजार रूपयाच्या लाचेची मागणी करणार्‍या केज येथील तहसीलदारासह कोतवालावर गुन्हा दाखल झाला आहे. संबंधित कोतवालाने 20 हजार रूपयाची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पकडले. तहसीलदार मात्र फरार झाला आहे.

बीड जिल्ह्यामध्ये गेल्या आठ दिवसात तीन अधिकार्‍यांवर लाच घेताना थेट कारवाई करण्यात आली. लाच दिल्याशिवाय कोणतेच काम होत नसल्याची गंभीर परिस्थिती बीड जिल्ह्यात निर्माण झाली आहे. लाच प्रकरणी ज्या अधिकार्‍यांना पकडण्यात आले त्यांच्याजवळ मोठे घबाडही सापडले आहे. अशीच एक घटना केज तहसील कार्यालयामध्ये घडली. धान्य दुकानदाराने ग्राहकांना वाटप केलेल्या धान्यामध्ये तफावत असल्याची तक्रार तहसीलदारांकडे करण्यात आली होती. त्याविरोधात कारवाई न व्हावी यासाठी तहसीलदार अभिजित जगताप यांनी कोतवाल मच्छिंद्र माने यांच्या माध्यमातून 40 हजार रुपयाची धान्य दुकानदाराकडे मागणी केली. तडजोडीअंती 20 हजार रूपयाची लाच ठरली. याबाबत धान्य दुकानदाराने लाचलुचपत प्रतिबंधक खात्याला कळवले होते. त्यानुसार कोतवाल मच्छिंद्र माने यास लाच घेताना रंगेहात जेरबंद करण्यात आले. मात्र तहसीलदार अभिजित जगताप फरार झाला आहे. या प्रकरणी बीड येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. धाराशिवचे पोलीस उपाधिक्षक सिद्धाराम म्हेत्रे यांनी हा सापळा रचला. यात पोलीस अंमलदार दिनकर उगलमुगले, मधुकर जाधव, सचिन शेवाळे, नागेश शेरकर, चालक दत्तात्रय करडे या पथकाचा सहभाग होता.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;