सत्ताधाऱ्यांच्या दबावामुळे ‘हे’ आरोपी पुन्हा रस्त्यावर मस्ती दाखवायला मोकळे होतील, विजय वडेट्टीवार यांची टीका

सत्ताधाऱ्यांच्या दबावामुळे ‘हे’ आरोपी पुन्हा रस्त्यावर मस्ती दाखवायला मोकळे होतील, विजय वडेट्टीवार यांची टीका

पुण्यातील कल्याणीनगर येथील हिट अँड रन प्रकरणातील अल्पवयीन आरोपीच्या आईला देखील पोलिसांनी अटक केली आहे. आरोपीच्या आईची व अल्पवयीन आऱोपीची समोरासमोर चौकशी केली जाणार आहे. मात्र या प्रकरणातील आरोपीच्या आईला इतक्या उशीरा अटक झाल्यावरून काँग्रेस नेते व विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला आहे.

आरोपीच्या आईला इतक्या दिवसांनी अटक करण्यात आली याव रून याप्रकरणात किती तत्पर कारवाई होत आहे ते दिसते, अशी टीका वडेट्टीवार यांनी केली आहे. तसेच या प्रकरणात राजकीय दबाव आणणाऱ्या आमदारावर कधी कारवाई होणार असा सवाल देखील त्यांनी केला आहे. वडेट्टीवार यांनी ट्विटरवरून सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला आहे.

”पुणे हिट अँड रन प्रकरणातील आरोपीच्या आईला अखेर इतक्या दिवसांनी अटक करण्यात आली. या प्रकरणात किती तत्पर कारवाई होते याचे उदाहरण आहे. सदर प्रकरणात हस्तक्षेप करून राजकीय दबाव आणणाऱ्या आमदाराबाबत पोलिसांची नेमकी काय भूमिका आहे? आमदारावर कधी कारवाई होणार? असे अनेक प्रश्न अजूनही अनुत्तरीत आहे.म्हणूनच या प्रकरणाची न्यायिक चौकशी झाली तरच सर्व आरोपींना कठोर शिक्षा होवू शकेल. नाही तर सत्ताधाऱ्यांच्या दबावामुळे लवकरच हे सर्व आरोपी पुण्याच्या रस्त्यावर पुन्हा पैसा आणि राजकीय ताकद ची मस्ती दाखवण्यात मोकळे होतील”, असे ट्विट वडेट्टीवार यांनी केले आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;