सलमान खानचा ‘सिद्धू मुसेवाला’ करण्याचा कट, लॉरेन्स बिष्णोई गँगच्या 4 शूटरला पोलिसांकडून अटक

सलमान खानचा ‘सिद्धू मुसेवाला’ करण्याचा कट, लॉरेन्स बिष्णोई गँगच्या 4 शूटरला पोलिसांकडून अटक

बॉलिवूड अभिनेता सलमान खान याच्यावरील हल्ल्याचा कट पोलिसांनी उधळून लावला आहे. नवी मुंबई पोलिसांनी लॉरेन्स बिष्णोई गँगच्या 4 शूटरला अटक केली आहे. या शूटरनी पनवेलमध्ये सलमान खान याच्या गाडीवर हल्ला करून त्याचा ‘सिद्धू मुसेवाला’ करण्याचा कट रचला होता. यासाठी पाकिस्तानमधून हत्यार सप्लाय करणाऱ्यांकडून हत्यार मागवण्याचीही योजना आखण्यात आली होती. ‘आज तक’ने याबाबत वृत्त दिले आहे.

पोलिसांनी अटक केलेले चारही आरोपी लॉरेन्स बिष्णोई गँगचे सदस्य आहेत. या आरोपींनी सलमान खान याच्या फॉर्म हाऊससह अनेक ठिकाणी रेकी केली होती. सलमान खानवर Ak- 47 सह अन्य अत्याधुनिक हत्यारांनी गोळीबार करण्याचे आदेश त्यांना म्होरक्याकडून मिळाले होते. यासंबंधी व्हिडिओही आरोपींच्या मोबाईलमधून जप्त करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.

पोलिसांनी अटक केलेल्या आरोपींची नावे धनंजय उर्फ अजय कश्यप, गौरव भाटिया उर्फ नहवी, वासपी खान उर्फ वसीम चिकना आणि रिजवान खान उर्फ ​​जावेद खान आहेत. त्यानंतर पोलिसांनी लॉरेन्स बिष्णोई, अनमोल बिष्णोई, संपत नेहरा, गोल्डी बरारसह 17 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करत तपास सुरू केला आहे.

पोलीस चौकशी दरम्यान आरोपींनी धक्कादायक खुलासे केले आहेत. अटकेतील आरोपी अजय कश्यप पाकिस्तानमधील डोगा नावाच्या व्यक्तीच्या संपर्कात होता. तो एम-16, एके-47 आणि एके-92 खरेदी विक्रीचे काम करत होता. त्याच्याकडून हत्यार घेऊन सलमान खान याच्या शरीराची चाळणी करण्याचा कट आरोपींनी रचला होता.

14 एप्रिलला घरावर गोळीबार

दरम्यान, याच वर्षी 14 एप्रिल रोजी सलमान खान याच्या घरावर गोळीबार झाला होता. लॉरेन्स बिष्णोई गँगच्या दोन शूटरने हा गोळीबार केला होता. दुचाकीवरून आलेल्या शूटरने सलमानच्या घराच्या दिशेने गोळीबार करत पळ काढला होता. ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली होती. त्यानंतर आरोपींना अटक करण्यात आली. त्यांनी लॉरेन्स बिष्णोई गँगकडून सुपारी मिळाल्याचे कबूल केले होते.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;