त्यांना विकतही घेता येत नाही, आणि…, मलायका – अर्जुनचं ब्रेकअप, अभिनेत्रीची क्रिप्टिक पोस्ट व्हायरल

त्यांना विकतही घेता येत नाही, आणि…, मलायका – अर्जुनचं ब्रेकअप, अभिनेत्रीची क्रिप्टिक पोस्ट व्हायरल

अभिनेता अर्जुन कपूर आणि अभिनेत्री मलायका अरोरा कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असतात. कायम चाहत्यांना कपल गोल्स देणारे अर्जुन – मलायका आता ब्रेकअपमुळे चर्चेत आले आहेत. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त मलायका – अर्जुन यांच्या ब्रेकअपची चर्चा रंगली आहे. पण यावर दोघांनी देखील अधिकृत वक्तव्य केलेलं नाही. पण मलायका हिने सोशल मीडियावर शेअर केलेल्या पोस्टने चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. अभिनेत्री पोस्ट सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

मलायका हिने इन्स्टाग्राम स्टोरीवर एक क्रिप्टिक पोस्ट शेअर केली आहे. ‘जमीनीवरील सर्वांत मोठं धन ती लोकं आहेत, जे आपल्यावर जीवापाड प्रेम करतात. आपल्यासोबत कायम उभे असतात. अशा लोकांना विकतही घेता येत नाही आणि त्यांची जागा देखील कोणी घेऊ शकत नाही… आपल्या सर्वांकडे अशी लोकं फार कमी असतात….’ सध्या अभिनेत्रीची पोस्ट तुफान व्हायरल होत आहे.

 

 

View this post on Instagram

 

A post shared by Malaika Arora (@malaikaaroraofficial)

 

पोस्ट शेअर करताना अभिनेत्रीने कोणाच्या नावाचा उल्लेख केलेला नाही. पण मलायका हिने पोस्ट अर्जुन याच्यासाठी शेअर केली असावी असा अंदाज नेटकरी व्यक्त करत आहे. अशात जोपर्यंत दोघेही त्यांच्या नात्याबद्दल अधिकृत घोषणा करत नाही… तोपर्यंत मलायका – अर्जुन यांचं ब्रेकअप खरं झालं आहे की नाही… काहीही सांगता येणार नाही.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मलायका – अर्जुन यांनी परस्पर सहमतीने विभक्त होण्याचा निर्णय घेतल्याची माहिती समोर येत आहे. गेल्या 5 वर्षांपासून मलायका – अर्जुन एकत्र आहेत. पण आता दोघांच्या ब्रेकअपच्या चर्चांनी जोर धरला आहे.

सांगायचं झालं तर, याच वर्षी जानेवारी महिन्यात मलायका – अर्जुन यांच्या ब्रेकअपची चर्चा रंगली होती. पण दोघांनी नातं संपवण्यापेक्षा नात्यावर काम करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर अनेक ठिकाणी दोघांना एकत्र स्पॉट देखली करण्यात आलं. पण आता पुन्हा ब्रेकअपच्या चर्चांना उधाण आलं आहे.

मलायका हिच्याबद्दल सांगायचं झालं तर, अभिनेता अरबाज खान याच्यासोबत 2017 मध्ये घटस्फोट झाल्यानंतर मलायका हिच्या आयुष्यात अभिनेता अर्जुन कपूर याची एन्ट्री झाली. 2019 मध्ये मलायका – अर्जुन यांनी नात्याची स्वीकार केला होता.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;