ब्रेकअपनंतर आता मलायका अरोराने शेअर केलेली इंस्टाग्राम स्टोरी चर्चेत ?

ब्रेकअपनंतर आता मलायका अरोराने शेअर केलेली इंस्टाग्राम स्टोरी चर्चेत ?

बॉलीवूड अभिनेत्री मलायका अरोरा आणि अभिनेता अर्जुन कपूर या लव्हबर्डच्या ब्रेकअपच्या बातम्या समोर आल्या आहेत. अनेकांनी त्यांच्या या ब्रेकअपच्या बातमीला दुजोरा दिला असताना आता या बातम्यांमध्ये मलायकाने इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे.

पिंकविल्लाच्या वृत्तानुसार, अर्जुन कपूर आणि मलायका अरोरा यांच्या नात्यात दुरावा आला आहे. अनेकांनी दोघांचे ब्रेकअप झाल्याच्या वृत्ताला पुष्टी दिलेली आहे. मलायका आणि अर्जुन दोघे सामोपचाराने वेगळे झाल्याचे बोलले जात आहे. एका सूत्राक़डून मिळालेल्या माहितीनुसार, मलायका आणि अर्जुनमध्ये एक खास नाते होते आणि दोघांच्या हृदयात एकमेकांचे खास स्थान होते. मात्र काही कारणाने दोघांनी सामंजस्याने वेगळे होण्याचा निर्णय घेतला. दोघे कोणालाही त्यांच्या नात्यावर टीका करण्याचा अधिकार देत नाहीत. त्यांचे बराच काळ चाललेले छानसे नाते होते जे संपले आहे. याचा अर्थ असा नाही की दोघांमध्ये काही मतभेद होते. दोघेही एकमेकांचा आदर करतात, एकमेकांची ताकद आहेत. दोघांनी हे नाते जपले आहे. ते यापुढेही एकमेकांचा आदर करतील. दोघंही अनेक वर्ष नात्यात होते. त्यामुळे त्यांच्या या निर्णयाचा आदर करुन त्यांना त्यांचा वेळ द्यावा.

Malaika Arora Post

 

तर मलायकाने आपल्या इंस्टाग्राम पोस्ट शेअर करत सर्वांचे लक्ष वेधले आहे. त्या पोस्टमध्ये ती म्हणाली, प्रेम आणि पाठिंबा असा उल्लेख केला आहे. त्यात ती म्हणते की, जमिनीवर सर्वात मोठा खजाना आहे. जे तुमच्यावर प्रेम करतात आणि पाठिंबाही देतात. त्यांची खरेदी किंवा रिप्लेस केले जाऊ शकत नाही. आपल्या सर्वांकडे अशी कमी लोकं असतात.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;