अंबानी कुटुंबातील ‘या’ सूना वयाने पतीपेक्षा आहेत मोठ्या; राधिका मर्चंटचाही समावेश
अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या प्री-वेडिंग फंक्शनमुळे सध्या अंबानी कुटुंबीय तुफान चर्चेत आहेत. राधिका लवकरच अंबानी कुटुंबाची सून होणार आहे. अनंतपेक्षा राधिका वयाने थोडी मोठी आहे. पण अंबानी कुटुंबातील इतर सुनाही त्यांच्या पतीपेक्षा वयाने मोठ्या आहेत. त्यांच्या वयात किती अंतर आहे, ते पाहुयात..
मुकेश अंबानी यांचा भाऊ अनिल अंबानी यांनी अभिनेत्री टीना मुनिमशी लग्न केलं. टीना आणि अनिल अंबानी यांच्या वयात दोन वर्षांचं अंतर आहे. टीना या अनिल यांच्यापेक्षा वयाने दोन वर्षांनी मोठ्या आहेत. या दोघांना जय अनमोल आणि जय अंशुल ही दोन मुलं आहेत.
अंबानी कुटुंबाची मोठी सून श्लोका मेहता ही आकाश अंबानीची लहानपणापासूनची मैत्रीण आहे. श्लोका आणि आकाश यांचं शिक्षणसुद्धा धीरुभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूलमध्ये झालं. श्लोका ही आकाशपेक्षा वर्षभराने मोठी आहे.
श्लोकाचा जन्म 11 जुलै 1990 रोजी झाला. तर आकाशचा जन्म 23 ऑक्टोबर 1991 रोजी झाला. 2019 मध्ये त्यांनी लग्न केलं असून या दोघांना पृथ्वी आणि वेदा ही दोन मुलं आहेत.
अंबानी कुटुंबाची होणारी छोटी सून राधिका मर्चंटचा जन्म 18 डिसेंबर 1994 रोजी झाला. तर मुकेश आणि नीता यांचा छोटा मुलगा अनंत अंबानीचा जन्म 10 एप्रिल 1995 रोजी झाला. त्यामुळे राधिका ही अनंतपेक्षा काही महिन्यांनी मोठी आहे. जामनगरमध्ये प्री-वेडिंग पार पडल्यानंतर आता क्रूझवर दुसऱ्या प्री-वेडिंगचं आयोजन करण्यात आलं आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.





Comment List