‘ऐश्वर्या तुमची सून असूनही तुम्ही…’ अमिताभ बच्चन यांच्या पोस्टवर युजर्स संतापले

‘ऐश्वर्या तुमची सून असूनही तुम्ही…’ अमिताभ बच्चन यांच्या पोस्टवर युजर्स संतापले

बॉलीवूडचे मोस्ट फेवरेट कपल आभिनेता अभिषेक बच्चन आणि त्याची पत्नी ऐश्वर्या राय यांचा घटस्फोट होणार असल्याच्या चर्चा गेल्या काही महिन्यांपासून सुरू आहेत. त्यामुळे संपूर्ण बच्चन कुटुंब अस्वस्थ असल्याचं दिसत आहे. अशातच आता अमिताभ यांनी एक पोस्ट शेअर केली आहे. त्यांच्या या पोस्टमुळे त्यांना प्रचंड ट्रोल केलं जात आहे.

बॉलीवूडचे बीग बी अमिताभ बच्चन यांनी सोशल मीडिया प्लॅटफोर्म X वर एक पोस्ट केली होती. “हे गाणं प्रचंड लोकप्रिय झालं होतं. आजही या गाण्याला प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद आणि प्रेम मिळतं. मंचावर लाईव्ह सादरीकरण केलं होतं ती बेस्ट मोमेंट होती” असे ते म्हणाले. अमिताभ यांनी बंटी और बबली या चित्रपटाला 19 वर्षे पूर्ण झाल्यामुळे या चित्रपटातील गाण्यावर ही पोस्ट लिहिली आहे. या चित्रपटात अमिताभ बच्चन आणि अभिषेक बच्चन मुख्य भूमिकेत होते. तसेत ऐश्वर्या रायने या चित्रपटात पाहुणी कलाकार म्हणूक काम केलं होतं.

अमिताभ बच्चन यांनी शेअर केलेल्या या पोस्टमुळे नेटकरी चांगलेच संतापले आहेत. कारण अमिताभ यांच्या पोस्टमध्ये त्यांनी ऐश्वर्याचा उल्लेखही केलेला नाहीय. त्यामुळे चाहते प्रचंड नाराज झाले आहेत. ‘या गाण्यात ऐश्वर्या रायही आहे. तरी तुम्ही तिला टॅग केलेलं नाही. फक्त तुम्ही तुमच्या मुलालाच टॅग केलं आहे. तुम्ही आणि तुमचे कुटुंबीय जेव्हा तिला साईडलाइन करताना आम्ही पाहतो तेव्हा खूप दु:ख होतं. मात्र ऐश्वर्या प्रचंड हुशार आहे’, असं एका युजरने लिहिलं. “ऐश्वर्या राय या गाण्यात मुख्य डान्सर होती. तर तुम्ही दोघे सहाय्यक डान्सर होतात. एवढेच नाहीतर ती तुमची सून असून देखील तुम्ही तिला महत्त्व देत नाही. हे योग्य नाही”, असे मत अनेकांनी मांडले आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;