अकरावी प्रवेशाचा दुसरा टप्पा 5 जूनपासून; कॉलेज पसंतीक्रम भरता येणार
अकरावी ऑनलाईन प्रवेशाचा दुसरा टप्पा 5 जूनपासून सुरू होणार आहे. विद्यार्थ्यांना कॉलेज पसंतीक्रम भरता येणार आहे. अल्पसंख्यांक, व्यवस्थापन आणि इनहाऊस कोटय़ातील तसेच नियमित प्रवेश फेरींच्या प्रवेशाचे वेळापत्रक शनिवारी जाहीर होण्याची शक्यता आहे.
राज्य मंडळाच्या तसेच पेंद्रीय मंडळाच्या विद्यार्थ्यांनी अकरावी प्रवेशासाठी नोंदणी करून अर्जाचा भाग 1 भरला आहे. अशा विद्यार्थ्यांना आता दुसऱया टप्प्यात कॉलेज पसंतीक्रम भरावा लागणार आहे. पसंतीक्रम भरताना विद्यार्थ्यांना कमीत कमी 1 आणि अधिकाधिक 10 कॉलेजचे पर्याय निवडता येणार आहेत. मुंबईसह पिंपरी चिंचवड, नागपूर, नाशिक, अमरावती महानगरपालिका क्षेत्रात ऑनलाइन माध्यमातून सुरु असलेल्या अकरावी प्रवेशासाठी 2 लाख 49 हजार विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. त्यापैकी दोन लाखाहून अधिक विद्यार्थ्यांचे अर्ज अंतिम झाले आहेत. ज्या विद्यार्थ्यांचे अर्ज अंतिम पडताळणी झाले आहेत. त्या अर्जदार विद्यार्थ्यांना आपल्या आवडत्या महाविद्यालयाचे दहा पसंतीक्रम भरण्याची संधी अर्जाच्या भाग दोन मध्ये असते.यासंदर्भातील वेळापत्रक शनिवारी जाहीर केले जाणार आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List