तरुणांच्या बँक खात्यांचा झोलसाठी वापर; नाशिकमधून दोघा सायबर भामटय़ांना अटक

तरुणांच्या बँक खात्यांचा झोलसाठी वापर; नाशिकमधून दोघा सायबर भामटय़ांना अटक

वेगवेगळय़ा मार्गाने नागरिकांना टास्कचा पार्ट टाईम जॉब देण्याच्या बहाण्याने लाखो रुपयांचा चुना लावणारे व फसवणुकीचा पैसा विविध बँक खात्यांच्या माध्यमांतून मिळवणाऱया नाशिकमधील दोघा सायबर भामटय़ांना दक्षिण विभाग सायबर पोलिसांनी दणका दिला. दोघांना अटक करत त्यांच्याकडून 29 डेबिट कार्ड, बँकांची 28 पासबुक, आठ सिमकार्ड व मोबाईल जप्त करण्यात आले आहेत.

कुलाबा येथे राहणाऱया एका महिलेची काही दिवसांपूर्वी ऑनलाईन माध्यमातून फसवणूक झाली होती. आरोपींनी विविध व्हॉट्सअॅप नंबर तसेच टेलिग्रामवर वेगवेगळय़ा आयडीच्या माध्यमातून पार्ट टाईम टास्कच्या जॉबची ऑफर दिली होती. त्या ऑफरमधून बक्कळ पैसा कमावू असा समज करत ती महिला आरोपी सांगतील त्याप्रमाणे करत गेली. तिने आरोपींच्या सांगण्यावरून विविध बँक खात्यांवर तब्बल 14 लाख 23 हजार रुपये पाठवले. अखेर आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच तिने पोलिसांत धाव घेतली. महिलेच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल झाल्यानंतर दक्षिण विभाग सायबर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक नंदकुमार गोपाळे, सपोनि दीपक देसले तसेच अंमलदार मधुकर लहारे, सचिन धोत्रे, नितीन शिंदे यांनी तपास सुरू केला. महिलेने ज्या बँक खात्यांवर पैसे पाठविले होते त्या खात्यांचा अभ्यास केल्यावर त्यापैकी फेडरल बँकेचा खातेधारक हा नाशिक येथील एका हॉटेलात वेटरचे काम करत असल्याचे समोर आले. त्यानुसार पथकाने नाशिक गाठून त्या वेटरकडे चौकशी केल्यावर त्याचे बँक खाते आरोपींनी वापरल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे गोपाळे व पथकाने अधिक खोलात जाऊन तपास केल्यावर आरोपींनी नाशिक व परिसरातील हॉटेलात काम करणारे वेटर व त्यांच्या मित्रांच्या नावाने बँक खाती उघडून त्या खात्यांचा वापर फसवणुकीचा पैसा मिळविण्यासाठी केल्याचे उघडकीस आले. अशाप्रकारे सायबर गुन्हा करणारे हिमांशू मोरे (21) व प्रेम शेवाळे (18) या दोघांच्या मुसक्या आवळल्या.

आपला वाटा घेऊन उर्वरित पैसा…

नंदकुमार गोपाळे व त्यांच्या पथकाने दोन्ही आरोपींकडे कसून चौकशी केल्यावर आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली. आरोपी हे वेगवेगळय़ा तरुणांना चिरीमिरी देऊन त्यांच्या नावाने बँक खाते उघडायचे. त्या खात्यांवर फसवणुकीचा पैसा मिळवायचे.  मिळालेल्या रकमेतील आपला वाटा काढून घ्यायचे. मग उरलेल्या  रकमेतून अमेरिकन डॉलर खरेदी करायचे. ते अमेरिकन डॉलर  परदेशातील त्यांचे बॉस सांगतील त्या व्हिड्रॉवल अॅड्रेसवर पाठवायचे. मोरे हा शिक्षित असून तो प्रत्येक वेळी नागरिकांची फसवणूक करण्यासाठी वेगवेगळय़ा क्लृप्त्या लढवत असतो. या दोघांनी अनेकांची आर्थिक फसवणूक केल्याचा संशय असून पोलीस अधिक तपास करीत आहेत.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;