शक्तिवर्धक औषधांचा ऑनलाईन काळाबाजार उघड

शक्तिवर्धक औषधांचा ऑनलाईन काळाबाजार उघड

बोगस कॉलसेंटर थाटून अमेरिकन नागरिकांना डॉक्टरांच्या प्रिस्क्रीप्शनविना सेक्सवर्धक औषधे विकण्याचा विक्रोळी येथे सुरू असलेला काळाबाजार गुन्हे शाखेच्या युनिट-10 ने उद्ध्वस्त केला. याप्रकरणी पोलिसांनी दहा जणांना अटक केली असून विविध साहित्य हस्तगत केले आहे.

विक्रोळी पश्चिमेकडील पार्कसाईट पोलीस ठाण्यातच्या हद्दीत असलेल्या कैलास इंडस्ट्रिअलमध्ये बोगस कॉल सेंटर सुरू असल्याची माहिती सहाय्यक पोलीस आयुक्त महेश देसाई यांना मिळाली. माहिती आवश्यक खातरजमा केल्यानंतर महेश देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभारी निरीक्षक दीपक सावंत, निरीक्षक सुतार, सपोनि चौधरी, तोडकर तसेच कांबळे, जगताप, निर्मळे, महिला अंमलदार सोनावणे, चव्हाण या पथकाने त्या कॉल सेंटरवर धडक दिली. त्यावेळी तेथे बरेच तरुण व्हीसी डायलरचा वापर करून व्हीओ आयपी कॉलद्वारे अमेरिकन नागरिकांना संपर्क साधून त्यांना  व्हायग्रा व सिऑलिस ही शक्तिवर्धक औषधे डॉक्टरांच्या प्रिस्क्रीप्शनविना बेकायदेशीरपणे विकत असल्याचे आढळून आले.  अशा प्रकारे ते नागरिक व शासनाची फसवणूक करीत होते. त्यामुळे हे बोगस कॉल सेंटर थाटणाऱया रितेश शेट्टी (28) आणि सुमित जाधव (30) या दोघांसह आठ कॉलर्सना अटक केली आहे. घटनास्थळावरून पोलिसांनी चार हार्डडिस्क, तीन मोबाईल, राऊटर, संगणकातील माहिती हस्तगत केली आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;