पायल तडवी आत्महत्या प्रकरण; नायर रुग्णालयातील वरिष्ठ डॉक्टरांची दोषमुक्तता नाही
डॉ. पायल तडवी आत्महत्या प्रकरणात नायर रुग्णालयातील तीन वरिष्ठ डॉक्टरांच्या अडचणीत वाढ झाली आहे. भक्ती मेहरे, हेमा अहुजा व अंकिता खंडेलवाल या आरोपी डॉक्टरांचा दोषमुक्ततेचा अर्ज सत्र न्यायालयाने फेटाळला. न्यायालय पाच वर्षांनंतर या आरोपी डॉक्टरांविरुद्ध आरोप निश्चिती करणार आहे.
डॉ. पायल तडवी यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी भक्ती मेहरे, हेमा अहुजा व अंकिता खंडेलवाल या वरिष्ठ डॉक्टरांना अटक केली होती. जामिनावर सुटका झाल्यानंतर या तिन्ही डॉक्टरांनी दोषमुक्ततेसाठी अर्ज केला होता. तथापि, विशेष न्यायालयाचे (अॅट्रॉसिटी कायदा) न्यायाधीश एस. एम. तपकिरे यांनी त्यांचा अर्ज फेटाळला.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List