Water Shortage : रत्नागिरी जिल्ह्यात 106 गावांमध्ये भीषण पाणी टंचाई
On
राज्यात उष्णतेच्या तीव्रतेमुळे पाणवठे कोरडे पडायला लागले आहेत. त्यामुळे पाण्याची गंभीर समस्या ग्रामीण भागांमध्ये भेडसावत असल्याचे चित्र आहे. रत्नागिरी जिल्ह्यामध्ये 106 गावांमधील 258 वाड्यांमध्ये भीषण पाणी टंचाई निर्माण झाली आहे. तब्बल 58 हजार 124 ग्रामस्थांना पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे.
रत्नागिरी जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांमध्ये सध्या पाणी टंचाईची भीषण परिस्थिती आहे. जिल्ह्यातील 106 गावांमधील 250 वाड्यांना 24 टँकरच्या माध्यमातून पाणी पुरवठा केला जात आहे. या 24 टँकरमध्ये 4 शासकीय आणि 20 खासगी टँकरचा समावेश आहे. तालुकानिहाय आकडेवारी पाहिली तर सर्वच तालुक्यांमध्ये परिस्थिती जवळपास सारखी असल्याचे चित्र आहे.
- मंडणगड तालुक्यात 5 गावांमधील 5 वाड्यांमध्ये 853 ग्रामस्थांना एका टँकरने पाणी पुरवठा सुरू आहे.
- दापोली तालुक्यात 15 गावांमधील 20 वाड्यांमध्ये 5 हजार 070 ग्रामस्थांना एका टँकरने पाणी पुरवठा सुरू आहे.
- खेड तालुक्यात 17 गावांमधील 44 वाड्यांमध्ये 5 हजार 109 ग्रामस्थांना एका टँकरने पाणी पुरवठा सुरू आहे.
- गुहागर तालुक्यात 2 गावांमधील 6 वाड्यांमध्ये 2 हजार 590 ग्रामस्थांना एका टँकरने पाणी पुरवठा सुरू आहे.
- चिपळूण तालुक्यात 16 गावांमधील 35 वाड्यांमध्ये 11 हजार 391 ग्रामस्थांना एका टँकरने पाणी पुरवठा सुरू आहे.
- संगमेश्वर तालुक्यात 24 गावांमधील 42 वाड्यांमध्ये 4 हजार 824 ग्रामस्थांना दोन टँकरने पाणी पुरवठा सुरु आहे.
- रत्नागिरी तालुक्यात 14 गावांमधील 89 वाड्यांमध्ये26 हजार 596 ग्रामस्थांना 13 टँकरने पाणी पुरवठा सुरू आहे.
- लांजा तालुक्यात 4 गावांमधील 6 वाड्यांमध्ये 675 ग्रामस्थांना एका टँकरने पाणी पुरवठा सुरू आहे.
- राजापूर तालुक्यात 9 गावांमधील 11 वाड्यांमध्ये 1 हजार 016 ग्रामस्थांना 3 टँकरने पाणी पुरवठा सुरु आहे.
Tags:
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Related Posts
Post Comment
Latest News
24 Aug 2026 17:13:44
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
Comment List