हिंगोली जिल्हाधिकाऱ्यांच्या बंगल्यात चंदनचोरी, महिनाभरापासून पोलीस चोरांच्या शोधात

हिंगोली जिल्हाधिकाऱ्यांच्या बंगल्यात चंदनचोरी, महिनाभरापासून पोलीस चोरांच्या शोधात

>> सचिन कावडे

हिंगोली जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्या बंगल्यातून चंदनचोरी करण्याचा प्रयत्न झाला. या घटनेला महिना उलटला. स्वत: जिल्हाधिकार्‍यांनी पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांच्यात कानात चंदनचोरीची गोष्ट सांगितली. त्यानंतर महिनाभरापासून तपास तरबेज पोलीस अधिकारी सीसीटीव्हीत दिसणार्‍या दोन अस्पष्ट चेहर्‍यांचा शोध घेत आहेत!

हिंगोलीचे जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांचे ‘समर्पण’ हे शासकीय निवासस्थान साईबाबा मंदिराशेजारी आहे. बंगल्यात प्रशस्त लॉन असून, वेगवेगळ्या प्रकारच्या झाडांची लागवड करण्यात आली आहे. यात चंदनाच्या झाडांचाही समावेश आहे. बंगल्याच्या सुरक्षेसाठी पोलीसही तैनात असतात. 18 आणि 19 एप्रिल रोजी बंगल्याची साफसफाई करण्यासाठी दोन खासगी कामगारांना बोलावण्यात आले होते. साफसफाईचे काम सुरू असतानाच मध्यरात्रीच्या सुमारास चंदनचोरांनी डल्ला मारण्याचा प्रयत्न केला. पोलिसांची सुरक्षा भेदून चंदनचोर लिलया बंगल्यात शिरले, चंदनाच्या बुंध्यातून गाभा काढण्याचा प्रयत्न चोरांनी केला. परंतु गाभा काढता न आल्याने हे चोर आल्यापावली परतही गेले! चोर आले आणि गेले पण पोलिसांना त्याचा थांगपत्ताही लागला नाही.

सीसीटीव्ही फुटेजमध्ये चोर दिसले

बंगल्याच्या आवारात चोर शिरले त्यांनी चंदनचोरी करण्याचा प्रयत्न केला. बंगल्यात लावण्यात आलेल्या सीसीटीव्हीमध्ये हा सगळा प्रकार वैâद झाला. सीसीटीव्हीचे फुटेज पाहून जिल्हाधिकारी पापळकर थक्क झाले. त्यांनी पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांच्या कानावर हा प्रकार घातला आणि चौकशीचे आदेश दिले. या चंदनचोरीचा तपास पोलीस निरीक्षक विकास पाटील यांच्याकडे सोपवण्यात आला. महिनाभरापासून पाटील सीसीटीव्ही फुटेज पाहून थकले आहेत. साफसफाईसाठी आलेल्या दोघांची कसून चौकशी करण्यात आली. पण चंदनचोर काही सापडले नाहीत.

पोलीस अधीक्षकांकडे तक्रार दिली – जिल्हाधिकारी पापळकर

निवासस्थानाच्या परिसरात चंदनाची अनेक छोटी-मोठी झाडे आहेत. या झाडांमधील गाभा काढण्याचा चोरट्यांनी प्रयत्न केला. मात्र, त्याला काही मिळाले नाही. लोकसभा निवडणुकीच्या गडबडीत असल्यामुळे पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांच्याकडे तक्रार दिली होती. पुढे या प्रकरणात काय झाले ? याची माहिती घेतली नसल्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी सांगितले.

स्थानिक गुन्हे शाखेकडून शोध सुरू आहे – पोलीस अधीक्षक जी. श्रीधर

जिल्हाधिकारी यांच्या निवासस्थानाच्या परिसरातील चंदनाच्या झाडातील गाभा काढण्याचा प्रयत्न करणार्‍या चंदनतस्करांना पकडण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विकास पाटील यांना आदेशित केले आहे. या प्रकरणातील आरोपींचा शोध सुरू असल्याचे पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांनी सांगितले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;