उद्धव ठाकरे यांची सोनम वांगचूक यांच्याशी चर्चा, लडाखवासियांना दिला शब्द

उद्धव ठाकरे यांची सोनम वांगचूक यांच्याशी चर्चा, लडाखवासियांना दिला शब्द

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते व विधानपरिषदेतील विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी शुक्रवारी लडाख येथील पर्यावरणवादी सोनम वांगचूक यांची भेट घेतली. यावेळी सोनम वांगचूक यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी फोनवरून चर्चा केली. या संभाषणात उद्धव ठाकरे यांनी लडाखवासियांच्या कल्याणासाठी सर्व परिने पाठिंबा देऊ असा शब्द सोनम वांगचूक यांना दिला.

 

अंबादास दानवे यांनी एक्स या समाजमाध्यमांवर सोनम वांगचूक यांच्यासोबतच्या भेटीचे फोटो शेअर केले आहेत. दानवे यांनी वांगचूक यांच्या शैक्षणिक संस्थेला देखील भेट देत तिथल्या विद्यार्थांशी संवाद साधला. यावेळी त्यांच्यात वांगचूक यांच्या आंदोलनाविषयी देखील चर्चा झाली.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;