Prajwal Revanna : प्रज्वल रेवण्णाला 6 जून पर्यंत पोलीस कोठडी

Prajwal Revanna : प्रज्वल रेवण्णाला 6 जून पर्यंत पोलीस कोठडी

कर्नाटकमधील सेक्स स्कँडल आणि लैंगिक शोषणाचे आरोप असणारा जेडीएसचा निलंबित खासदार प्रज्ज्वल रेवन्ना याला 6 जून पर्यंत पोलीस कोठडीत पाठवण्यात आले आहे. प्रज्वल शुक्रवारी सकाळी जर्मनीहून बंगळुरू येथे येताच पोलिसांनी त्याला विमानतळावरून त्याला अटक केली. त्यानंतर त्याला न्यायालयात हजर करण्यात आले.

लोकसभा निवडणूकीत भाजप-जेडीएस युतीचा हसन मतदारसंघाचा उमेदवार असलेल्या प्रज्वलचे शेकडो अश्लील व्हिडीओ समोर आले होते. लैंगिक शोषणाचे शेकडो व्हिडीओ समोर आल्यानंतर 27 एप्रिल रोजी तो जर्मनीला पळाला होता. दोन दिवसांपूर्वी प्रज्वलने एक व्हिडीओ शेअर करत 31 मे रोजी तो शरण येणार असल्याचे जाहीर केले होते. त्यानुसार गुरुवारी मध्यरात्री तो बंगळुरूत परतला. बंगळुरू विमानतळावर उतरताच तपास पथकाने त्याला अटक केली. अटकेनंतर महिला पोलिसांच्या पथकाच्या जीपमधून सीआयडी ऑफिसमध्ये नेण्यात आले. रात्रभर त्याला सीआयडी ऑफिसमध्ये ठेवण्यात आले होते. शुक्रवारी दुपारी त्याला न्यायालयात हजर केले असता. न्यायालयाने त्याची 6 जून पर्यंत पोलीस कोठडीत रवानगी केली आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;