मलकापूर भाजपातील अंतर्गत वाद चव्हाट्यावर ; कृउबासच्या सभापतीवर अविश्वास ठराव
कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती भाजपचे शिवचंद्र तायडे यांच्या विरोधात दाखल करण्यात आलेल्या अविश्वास प्रस्तावावर शुक्रवार 31 मे रोजी सकाळी 11 वाजता विशेष सभेचे आयोजन करण्यात आले होते. प्रचंड गदारोळात 13 विरुद्ध 2 मताने शिवचंद्र तायडे यांच्या विरोधात अविश्वास ठराव मंजूर करण्यात आला. मलकापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या या विशेष सभेच्या वेळी प्रचंड पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. तरीही प्रचंड गदारोळात दोन्ही गटातील कार्यकर्ते भिडले होते. त्यामुळे प्रचंड नारेबाजी, लाठीचार्ज, दगडफेक, पळापळ यामुळे सर्वत्र एकच गोंधळ उडाला होता. कलम 144 असतांना सुद्धा नागरिकांची प्रचंड गर्दी होती. पोलीस प्रशासनाची हलगर्जी पाहतांना मिळाली. हजारोच्या संख्येने नागरिक कृउबासच्या गेट समोर गर्दी करून होते. तरी सुद्धा पोलीस पाहतच होते. मग 144 कलम लावून काय फायदा झाला. पोलिसांच्या तर्फे कायद्याचे उल्लंघन करण्यात आले.
मलकापूर बाजार समितीचे सभापती शिवचंद्र तायडे यांच्या विरोधात 20 मे रोजी अविश्वास ठरावाची मागणी केली होती. शुक्रवारी विशेष सभा आयोजित करण्यात आली होती. माजी आमदार चैनसुख संचेती यांच्या गटाने हा ठराव जिंकला. संचेती गटाला 13 संचालकांनी पाठिंबा दिला तर तायडे यांच्या बाजूने 2 संचालक होते. अत्यंत तणावपूर्वक वातावरणात दोन्ही गटाचे शेकडो कार्यकर्ते समोरासमोर आल्याने दोन्ही समर्थकांकडून नारेबाजी करण्यात आली होती. यावेळी दगडफेक, पळापळ व जमाव पांगवण्यासाठी पोलिसांनी सौम्य लाठीचार्ज केला. ही विशेष सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेचे कामकाज मलकापूर येथील तहसीलदार राहुल तायडे यांच्या अध्यक्षतेखाली नायब तहसीलदार गोतकर, सहायक निबंधक महेश कृपलानी यांनी पाहिले.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List