दहा वर्षांत 20 कोटींचा खर्च तरीही गंगा अस्वच्छच; जयराम रमेश यांचा मोदी सरकारवर हल्लाबोल
लोकसभा निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्याचे मतदान शनिवारी 1 जून रोजी होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा वाराणसीतून लोकसभा निवडणूक लढवत आहेत. मात्र त्याआधी गंगा नदीच्या स्वच्छतेवरून राजकारण तापले आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जयराम रमेश यांनी केंद्र सरकारवर हल्लाबोल केला आहे. गंगा स्वच्छ करू असे आश्नासन दिले होते. मात्र 10 वर्षे लोटली तरी गंगा स्वच्छ झाल्याचे दिसले नाही. उलट 10 वर्षांत 20 कोटी खर्च केला. मात्र, गंगा अस्वच्छच राहिल्याची जोरदार टीका जयराम रमेश यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत केली आहे.
2014 च्या तुलनेत गंगा नदी अधिक प्रदूषित झाली आहे. पूर्वी येथील प्रदूषित क्षेत्रांची संख्या 51 होती. मात्र आता ती 66 झाली आहे. येथील पाण्यात अॅण्टिबायोटिक प्रतिरोधक बॅक्टेरिया सापडू लागले आहेत. यावर्षी फेब्रुवारी महिन्यात बिहार सरकारचा एक अहवाल समोर आला. या अहवालानुसार गंगेचे पाणी ना आंघोळीसाठी वापरण्या योग्य आणि ना शेतातील पिकांसाठी, असे जयराम रमेश म्हणाले. 2009 मध्ये पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्या सरकारने ‘मिशन गंगा’ सुरू केले होते. मात्र नंतर त्याचे नाव बदलून ‘नमामि गंगा’ करण्यात आले. मागील केंद्र सरकारने 2009 मध्ये राष्ट्रीय गंगा नदी खोरे प्राधिकरणाची स्थापना केली होती. मात्र त्याचे नाव देखील बदलून राष्ट्रीय गंगा नदी परिषद, असे करण्यात आल्याचे जयराम रमेश यांनी पोस्टमध्ये म्हटले.
On June 1, the ancient and holy city of Varanasi will cast its vote. Narendra Modi has been its MP for 10 years and has spent 10 years promising to revive the Ganga.
One of the outgoing PM’s first steps was to rebrand Mission Ganga, launched in 2009, into Namami Gange. Mission… pic.twitter.com/yyH0b3KBet
— Jairam Ramesh (@Jairam_Ramesh) May 31, 2024
जयराम रमेश यांनी आपल्या एक्सवरील पोस्टमध्ये ‘नमामि गंगा’ प्रकल्पावरूनही भ्रष्टाचाराचा आरोप केला आहे. ज्या खासगी कंत्राटदाराला ठेका देण्यात आला होता, त्यांची कामगिरी निकृष्ट दर्जाची असूनही त्यांना निधी देण्यात आला, असा आरोप जयराम रमेश यांनी केला. यासोबतच या योजनेबाबत कॅगच्या अहवालात नमूद केलेल्या त्रुटींकडेही जयराम रमेश यांनी लक्ष वेधले.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List