मलायका अरोरा – अर्जुन कपूर यांचा झालाय ब्रेकअप! दोघांनी घेतला मोठा निर्णय

मलायका अरोरा – अर्जुन कपूर यांचा झालाय ब्रेकअप! दोघांनी घेतला मोठा निर्णय

अभिनेत्री मलायका अरोरा आणि अभिनेत्री अर्जुन कपूर यांच्या नात्यात पुन्हा अडचण निर्माण झाली आहे. अभिनेता अरबाज खान याच्यासोबत 2017 मध्ये घटस्फोट झाल्यानंतर मलायका हिच्या आयुष्यात अभिनेता अर्जुन कपूर याची एन्ट्री झाली. 2019 मध्ये मलायका – अर्जुन यांनी नात्याची स्वीकार केला. गेल्या 8 वर्षांपासून मलायका – अर्जुन एकत्र आहेत. पण आता दोघांच्या ब्रेकअपच्या चर्चांनी जोर धरला आहे. काही दिवसांपूर्वी देखील मलायका – अर्जुन यांच्या नात्याच्या चर्चा तुफान रंगल्या होत्या. अखेर दोघे विभक्त झाल्याची माहिती मिळत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मलायका – अर्जुन एकमेकांचा सन्मान करतात. विभक्त होण्याचा निर्णय देखील दोघांनी सहमतीने घेतला आहे. दोघांच्या नात्याचा प्रवास आता संपला असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. शिवाय मलायका – अर्जुन यांचं नातं फार खास आहे. दोघांच्या मनात एकमेकांसाठी खास स्थान आहे.

 

 

View this post on Instagram

 

A post shared by Malaika Arora (@malaikaaroraofficial)

 

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दोघांनी नात्यावर मौन बाळगलं आहे. कारण सर्वत्र चर्चांना कारण नको म्हणून मलायका – अर्जुन यांनी अधिकृत घोषणा केलेली नाही. दोघांचं नातं फार काळ टिकलं, पण आता दोघांनी देखील विभक्त होण्याचा निर्णय घेतला आहे. विभक्त झाले असले तरी, दोघे कायम एकमेकांचा आदर करतील… असं देखील सूत्रांचं म्हणणं आहे.

विभक्त झाले असले तरी कोणत्याही कठीण परिस्थितीत दोघे एकमेकांसाठी उभे राहतील. लोकांनी त्यांच्या गोपनियतेचा आदर करावा… असं देखील सांगण्यात येत आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त मलायका – अर्जुन यांच्या नात्याची चर्चा रंगली आहे.

 

 

View this post on Instagram

 

A post shared by Malaika Arora (@malaikaaroraofficial)

 

सांगायचं झालं तर, याचवर्षी जानेवारी महिन्यात मलायका – अर्जुन यांच्या ब्रेकअपची चर्चा रंगली होती. पण दोघांनी नातं संपवण्यापेक्षा नात्यावर काम करण्याचा निर्णय घेतला होता. दरम्यान, अरबाज याच्या लग्नानंतर सर्वांच्या नजरा अर्जुन – मलायका यांच्यावर येऊन थांबल्या होत्या. पण आता दोघांचं ब्रेकअप झाल्याची माहिती समोर येत आहे.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;