नागपूरवर सूर्याचा प्रकोप! तापमान 56 अंशांवर, उन्हामुळे अंगाची लाही लाही
देशभरात उष्णतेच्या लाटेने लोक घामाघूम झाले असताना आता दिल्ली, राजस्थान, उत्तर प्रदेशननंतर महाराष्ट्रातील नागपूरमध्ये उष्णतेने कहर केला आहे. नागपुरातील चार स्वयंचलित हवामान केंद्रांपैकी दोनवर गुरुवारी 30 मे रोजी 50 अंश सेल्सिअस तापमान दाखवले होते. आता उत्तर अंबाझरी रोडवरील रामदासपेठ येथील पीडीकेव्हीच्या 24 हेक्टर खुल्या शेतीच्या मध्यभागी असलेल्या नागपूर हवामान केंद्रामध्ये 56 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. त्यामुळे हवामान विभागाकडून खबरदारीचा इशारा देण्यात आला आहे.
सोनेगाव येथील हवामान केंद्रावरही 54 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. वर्धा रोडवरील खापरी येथील सेंट्राल इन्स्टिट्यूशन ऑफ कॉटन रिसर्च च्या शेतात हवामान केंद्रावर तापमान 44 अंश सेल्सिअल दाखवले. रामटेक हवामान केंद्रामध्ये 44 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. दोन दिवसांपूर्वी दिल्लीत 52.9 तापमान झाले होते. टाईम्स ऑफ इंडियाच्या अहवालानुसार, हवामान विभागाने नागपुरात स्थापन केलेल्या चार स्वयंचलित हवामान केंद्रांपैकी दोन 50 अंश सेल्सिअसपेक्षा अधिक तापमानाचा उच्चांक दाखवला आहे. जो दिल्लीहून अधिक आहे. नागपूरच्या उत्तर अंबाझरी रोडवरील रामदासपेठ येथील पीडीकेव्हीच्या 24 हेक्टर खुल्या शेतीच्या मध्यभागी असलेल्या नागपूर हवामान केंद्रामध्ये 56 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे, असे अहवालात म्हटले आहे.
गेल्या दोन आठवड्यांपासून मध्य हिंदुस्थान, उत्तर हिंदुस्थान आणि पूर्व हिंदुस्थानात तीव्र उष्णता आहे. रेमाल चक्रीवादळाचे आगमन आणि केरळमध्ये मान्सूनचे नियोजित वेळेच्या तीन दिवस आधी आगमन झाल्यानंतर हवामान विभागाने एक दिवस आधीच सांगितले होते की, आता तापमानात हळूहळू घट होईल आणि मान्सून पुढे सरकल्याने लोकांना दिलासा मिळेल. मात्र नागपुरातील वाढत्या पाऱ्यामुळे स्थानिक लोक अस्वस्थ झाले आहेत. तर गुरुवारी दिल्लीचे कमाल तापमान 45 अंशांच्या आसपास नोंदवले गेले.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List