कंपन्या राज्याबाहेर जाणं हे ट्रिपल इंजिन सरकारचं अपयश; सुप्रिया सुळे यांचा हल्लाबोल

कंपन्या राज्याबाहेर जाणं हे ट्रिपल इंजिन सरकारचं अपयश; सुप्रिया सुळे यांचा हल्लाबोल

हिंजवडीमधील 37 आयटी कंपन्याच्या स्थलांतराला राज्यातील ट्रिपल इंजिन सरकार जबाबदार आहे. हे सरकार केवळ घरं फोडा, इन्कम टॅक्स, सीबीआय आणि ईडी यात व्यस्त आहे, असा हल्लाबोल राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्याध्यक्ष तथा खासदार सुप्रिया सुळे यांनी राज्य सरकारवर केला आहे. पुण्यातील सारसबागे समोरील अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्याला सुप्रिया सुळे यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी त्यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला आहे.

महाराष्ट्राच्या ट्रिपल इंजिन सरकारचे आणखी एक अपयश समोर आले आहे. फॉक्सकॉन प्रकल्पही पुण्यात येणार होता, मात्र तो आला नाही. अनेक उद्योग आपल्या राज्यातून दुसऱ्या राज्यात जात आहेत. हिंजवडी राजीव गांधी इन्फोटेक पार्क हे शरद पवारांच्या दूरदृष्टीतून सुरू झाले. त्यात फेज-1, फेज -2, फेज-3 असे मोठे इन्फ्रास्ट्रक्चर उभे करण्यात आले. यासाठी देशातून लोक आले गुंतवणूक केली. मात्र आज तिथे काय परिस्थिती निर्माण झाली हे सर्वजण पाहात आहेत, असे सुप्रिया सुळे म्हणाल्या.

आयटी पार्कच्या पायाभूत सुविधा, पाण्याचा प्रश्न यासाठी मी स्वतः अनेकदा तिथे बैठका घेतल्या आहेत. अनेक पालकमंत्र्यांकडे चर्चा केली आहे, औद्योगिक सचिव, एमआयडीसीचे अधिकारी यांच्यासोबत बैठका केल्या आहेत. तिथले प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न केले आहेत. मात्र राज्यातील सरकारकडे उद्योगांबद्दल गांभीर्य नाही. हे सरकार फक्त घरं फोडा , इन्कम टॅक्स, सीबीआय आणि ईडी यात इतकी व्यस्त आहे की त्यांना बेरोजगारी आणि भ्रष्टाचाराकडे त्यांना पाहायला वेळ नाही, असेही त्यांनी स्पष्टपणे सांगितले.

मिंधे सरकारची नामुष्की, हिंजवडीतील 37 कंपन्या महाराष्ट्रातून परराज्यात

त्या पुढे म्हणाल्या की, अहिल्यादेवी होळकर यांच्याकडे आपण आदर्शमाता म्हणून बघतो. अगदी लहान वयात त्यांच्यावर एक प्रसंग घडला पण त्या खचल्या नाहीत. एक आदर्श जीवन त्या जगल्या आणि लढल्या, हार त्यांनी मानली नाही. राजमाता जिजाऊ, अहिल्यादेवी होळकर या आमच्या आदर्श माता आहेत. देशातील कर्तृत्ववान महिला म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते, आज जयंतीनिमित्त आम्ही त्यांना विनम्रपणे अभिवादन करण्यासाठी येथे आलो आहोत.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;