पाणीसंकट! दिल्ली सरकारची सर्वोच्च न्यायालयात धाव, याचिका दाखल करत केली मागणी
दिल्लीत तापमानाने कहर केला असताना पाण्याच्या संकटानेही डोकं वर केलं आहे. तिथे पाण्याचे संकट भीषण झाले असून आता दिल्ली सरकारने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. दिल्ली सरकारने सर्वोच्च न्यायालयात एक याचिका दाखल केली आहे. त्यात हरियाणा सरकारला दिल्लीला अधिक प्रमाणात पाणीपुरवठा उपलब्ध करून देण्याचे निर्देश देण्याची मागणी करण्यात आली आहे जेणेकरून जलसंकटातून दिलासा मिळू शकेल.
दिल्लीतील आप सरकारने न्यायालयात सांगितले की, भीषण उकाड्यामुळे शहरात पाण्याची मागणी वाढली आहे. त्यामुळे शेजारील हरियाणा राज्याला एक महिन्यासाठी पाण्याचा अतिरिक्त पुरवठा दिल्लीला द्यावा असे निर्देश द्यावे.अशी मागणी केली आहे. सरकारने हेही सांगितले की, आपल्या सर्वांची जबाबदारी आहे की, दिल्लीत पाण्याची मागणी पूर्ण करावी. सोबतच शुक्रवारी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी एका ट्विटच्या माध्यमातून उत्तर प्रदेश आणि हरियाणा दोन्ही राज्यांना सहकार्य करण्याचे आवाहन केले. तर दिल्लीच्या जलमंत्री आतिशी यांच्यानुसार, हरियाणा सहकार्य करत नसल्याने दिल्लीत पाण्याचे भीषण संकट आल्याचा आरोप केला आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List