Israel-Hamas War: इस्त्रायलने युद्ध थांबविल्यास… हमासने समोर ठेवली अट
हमासने 7 ऑक्टोबर रोजी इस्रायलवर हल्ला केला, त्यानंतर दोन्ही बाजूंमध्ये रक्तरंजित संघर्ष सुरूच आहे. इस्त्रायलच्या राफा विरोधात तीव्र कारवाई होत असताना आता हमासने माघार घेत तडजोडीसाठी तयार असल्याचं म्हटलं आहे. पॅलेस्टिनी समूह हमासने यासंदर्भात माहिती दिल्याचे वृत्त आहे. विशेष बाब म्हणजे हमास इस्रायलसोबत वाटाघाटी करार करायला तयार आहे.
रॉयटर्स या वृत्तसंस्थेच्या माहितीनुसार, हमासचे म्हणणे आहे की, सध्या सुरू असलेल्या हल्ल्यासंदर्भात वाटाघाटीत सहभागी होणार नाहीत. तसेच इस्रायलनं युद्ध थांबवल्यास ते तडजोड करायला तयार असल्याचेही म्हटले आहे. विशेष म्हणजे हे वक्तव्य अशा वेळी आले आहे जेव्हा आंतरराष्ट्रीय न्यायालयाच्या म्हणजेच ICJ यांच्या आदेशानंतरही इस्रायल राफाविरोधात कारवाई करत आहे. हमासच्या प्रतिक्रियेनुसार, ‘हमास आणि पॅलेस्टिनी समूह आमच्या लोकांचे आक्रमण, उपासमार आणि हत्याकांडाच्या दरम्यान चर्चा (युद्धविरामावर) सुरू ठेवून या धोरणात सामील होणे स्वीकारणार नाहीत.’ त्यात पुढे म्हटले आहे की, ‘जर गाझामधील आमच्या लोकांवर युद्ध आणि हल्ले थांबवले तर आम्ही एक्सचेंज डीलसह पूर्ण करारासाठी तयार आहोत.’
विशेष म्हणजे याआधी इस्रायलने हमासने दिलेल्या ऑफर धुडकावून लावल्या आहेत. इस्रायलचे म्हणणे आहे की, राफामध्ये सुरू असलेली कारवाई हमासचा खात्मा करणे आणि ओलीसांची सुटका करणे आहे. मंगळवारीच इस्रायलने गाझामधील हमासविरुद्धचे युद्ध वर्षभर सुरू राहणार असल्याचं सांगितलं होतं.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List