कोळसा खाणी मधून घातक रासायनिक द्रव्य सोडल्यामुळे पिकं उध्वस्त, शेतकरी चिंतेत
चंद्रपूर जिल्ह्यात वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेड या सरकारी कोळसा खाणी मधून घातक रासायनिक द्रव्य सोडल्यामुळे शेतकऱ्यांची पिकं उध्वस्त झाल्याचा प्रकार समोर आलाय. चंद्रपूर शहरालगत असलेल्या नांदगाव पोडे या गावातील ही घटना असून जवळपास 40 ते 50 हेक्टर शेत जमिनीतील पिकं उध्वस्त झाली आहे.
या भागात प्रामुख्याने उन्हाळी धान आणि भाजीपाला पिकं घेतली जातात. मात्र गावाजवळ असलेल्या वेकोलिच्या कोळसा खाणीतून दूषित पाणी या भागात सोडण्यात येत आहे. या घातक रासायनिक पाण्यामुळे शेतातील पिकं आणि संपूर्ण शेतजमिन प्रदूषित तर होतच आहे पण शेतात काम करणाऱ्या शेतकऱ्यांना त्वचारोग होत असल्याचा आरोप देखील स्थानिकांनी केलाय. याबाबत स्थानिक शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन वेकोलीचे मुख्य प्रबंधक, उपमुख्य प्रबंधक यांच्यावरती कायदेशीर कारवाई करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याची मागणी संजीवनी पर्यावरणाचे अध्यक्ष राजेश बेल यांनी केली आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List