देशी गाईंच्या संवर्धनामुळे राज्यात दूध उत्पादन वाढणार; पुणे कृषी महाविद्यालयात साहिवाल गाय संवर्धन प्रकल्प मंजूर

देशी गाईंच्या संवर्धनामुळे राज्यात दूध उत्पादन वाढणार; पुणे कृषी महाविद्यालयात साहिवाल गाय संवर्धन प्रकल्प मंजूर

>>राजेंद्र वाडेकर

उत्तर प्रदेशातील मेरठ येथील केंद्रीय गाय संशोधन संस्थेतर्फे राहुरी कृषी विद्यापीठ पशुसंवर्धन व दुग्धशास्त्र विभागांतर्गत पुण्यातील कृषी महाविद्यालयात साहिवाल गाईंचे संवर्धन व संशोधनासाठी माहिती संकलन केंद्र (डेटा रेकार्ंडग युनिट) मंजूर झाल्याची माहिती कुलगुरू डॉ. पी. जी. पाटील यांनी दै. ‘सामना’शी बोलताना दिली. देशी गाई संवर्धनामुळे महाराष्ट्रात देशी गाईंचे दूध उत्पादन वाढीस हातभार लागेल,  असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.

दुधासाठी प्रसिद्ध असलेल्या साहिवाल गाईंच्या अनुवंशिक क्षमतेचे संवर्धन, प्रसार व अनुवंशिक सुधारणा करणे हे प्रकल्पाचे मुख्य उद्दिष्ट आहे.

‘शेतकऱयांच्या सहभागातून संशोधन’ ही संकल्पना या प्रकल्पामुळे वास्तवात उतरविण्यास यश मिळाले आहे. या प्रकल्पामुळे देशात दुधासाठी प्रसिद्ध असलेल्या महाराष्ट्रात भविष्यात साहिवाल गाईंचे मोठे हब तयार होण्यास मदत होणार आहे, अशी माहिती देशी गाय संशोधन व प्रशिक्षण केंद्राचे प्रमुख शास्त्र्ाज्ञ डॉ. सोमनाथ माने यांनी दिली. भारतीय कृषी संशोधन संस्थांतर्गत केंद्रीय गाय संशोधन संस्था, मेरठ या संस्थेची स्थापना सन 1987 मध्ये गाईंच्या देशी जातींवर संशोधन करण्यासाठी करण्यात आली. देशामध्ये प्रामुख्याने दुधासाठी प्रसिद्ध असलेल्या साहिवाल, गीर व कांकरेज गाईंवरती संशोधन येथे चालू आहे.

या प्रकल्पाच्या तांत्रिक कार्यक्रमात जर्म प्लाझ्म व डेटा रेकार्ंडग युनिट्स यांची स्थापना विविध कृषी विद्यापीठे व भारतीय कृषी संशोधन संस्था येथे केलेली आहे. गाईच्या साहिवाल जातीचे जर्म प्लाझ्म युनिट कर्नाल (हरियाणा) इथे असून, देशामध्ये लुधियाना (पंजाब), पंतनगर (उत्तराखंड) व हिसार (हरियाणा) या तीन ठिकाणी डेटा रेकार्ंडग युनिट आहे. येथे शेतकरी व सरकारी फार्मवरती असलेल्या गाईंची नोंदणी केली जाऊन त्यांची इत्यंभूत माहिती संकलित करून जातिवंत पैदाशीच्या माध्यमातून अनुवंशिक सुधारणा केली जाते. जर्म प्लाझ्म युनिटमध्ये उच्च वंशावळीच्या गाईंपासून जन्मलेल्या नामांकित वळूंची चाचणी करून प्रोजेनी टेस्टिंगच्या कार्यक्रमांमध्ये समावेश केला जातो.

27 देशांमध्ये निर्यात

n हिंदुस्थान व पाकिस्तानच्या सीमावर्ती भागातील पंजाब प्रांतातील साहिवाल जिल्हा हे साहिवाल गाईंचे उगमस्थान आहे. या गाई लंबी बार, लोला, मॉन्टगोमेरी, मुलतानी आणि तेली अशा नावांनीदेखील ओळखल्या जातात. अत्यंत शांत स्वभावाच्या साहिवाल गाई देशातील सर्वोत्कृष्ट दूध देणाऱया देशी गाईंच्या जातींमध्ये ओळखल्या जातात. उष्णता सहन करत जास्त दूध उत्पादन देण्याच्या क्षमतेमुळे या गाई आशिया खंडातच नव्हे, तर जगभरात 27 देशांमध्ये निर्यात केल्या गेल्या आहेत.

साहिवाल क्लब ऑफ महाराष्ट्रमध्ये 5000 गाईंचे संगोपन

n राहुरी महात्मा फुले कृषी विद्यापीठांतर्गत पुणे कृषी महाविद्यालयाच्या पशुसंवर्धन व दुग्धशास्त्र्ा विभागाने सन 2015 मध्ये पुणे जिह्यात साहिवाल क्लब ऑफ महाराष्ट्राची स्थापना केली होती. त्यावेळी निवडक उच्चशिक्षित शेतकऱयांना व कृषी पदवीधरांना एकत्र करून अठरा गाईंपासून हा प्रकल्प चालू केला. सध्या यामध्ये 5000 पेक्षा जास्त साहिवाल गाईंचे संवर्धन केले जाते. शेतकरी सहभागातून देशी पशुधनाच्या संवर्धनासाठी उभी राहिलेली देशातील एकमेव चळवळ आहे. ज्या शेतकऱयांकडे या गाई आहेत, त्या गाईंची अनुवंशिक सुधारणा करण्यासाठी मदत होणार आहे.

अधिक दूध उत्पादनामुळे मागणी

n साहिवाल गाईंची सरासरी दूध उत्पादन क्षमता 2500 ते 2750 लीटर प्रतिवेत इतकी असून, दुधातील स्निग्धांशाचे प्रमाण 4.5 ते 4.75 टक्के इतके आहे. हवामान बदलामध्ये तग धरण्याची क्षमता, रोगास कमी बळी पडण्याची क्षमता व अधिक दूध उत्पादन या गोष्टींमुळे शेतकऱयांकडून साहिवाल गाईंची मागणी वाढत आहे.

देशातील चौथे युनिट

n महात्मा फुले कृषी विद्यापीठास मंजूर झालेले डेटा रेकार्ंडग युनिट देशातील चौथे आहे. सदर प्रकल्प देशातील ठराविक कृषी विद्यापीठांमध्येच राबविला जात असून, महाराष्ट्रामध्ये त्याचा मान राहुरी महात्मा फुले कृषी विद्यापीठास मिळाला आहे. विद्यापीठाच्या देशी गाय संशोधन व प्रशिक्षण केंद्राचे प्रमुख डॉ. सोमनाथ माने नवीन प्रकल्पात शास्त्र्ाज्ञ म्हणून, तर डॉ. विष्णू नरवडे व डॉ. धीरज कंखरेसह शास्त्र्ाज्ञ म्हणून काम पाहणार आहेत.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;