घाटकोपरच्या डोंगरउतारावरील 400 कुटुंबांना पालिकेची नोटीस

घाटकोपरच्या डोंगरउतारावरील 400 कुटुंबांना पालिकेची नोटीस

पावसाळा तोंडावर आला असताना डोंगरउतारावर धोकादायक स्थितीत राहणाऱया रहिवाशांनी अजूनही स्थलांतर केलेले नाही. त्यामुळे पावसाळा सुरू होण्याआधी सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करावे, अशी नोटीस घाटकोपरमध्ये डोंगरउतारावर धोकादायक स्थितीत राहणाऱया 400 कुटुंबांना ‘एन’ वॉर्ड ऑफिसकडून बजावण्यात आल्या आहेत. पावसाळय़ात या ठिकाणी कोणत्याही प्रकारची दुर्घटना घडल्यास पालिका प्रशासन जबाबदार राहणार नाही, असा इशाराही पालिकेने दिला आहे.

मुंबईत पूर्व उपनगरात दरडी आणि डोंगराळ भाग सर्वाधिक आहे. यामध्ये अतिवृष्टीत वारंवार दरडी कोसळून जीवित-वित्तहानीचा धोका असतो. डोंगरउतारावरील या झोपडय़ा जिल्हाधिकारी किंवा इतर प्राधिकरणांच्या अखत्यारीत येतात. या ठिकाणी धोकादायक ठिकाणी राहत असल्यामुळे शेकडो रहिवाशांचा जीव धोक्यात आहे. त्यामुळे या झोपडपट्टीवासीयांनी पावसाळय़ाआधी सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करावे, अशा नोटिसा बजावल्या.

अशी आहेत धोकादायक ठिकाणे
‘एन’ विभाग घाटकोपर कार्यालय हद्दीतील विक्रोळी पार्कसाईट, विक्रोळी (पश्चिम) आणि घाटकोपर (पश्चिम) भागातील वर्षानगर, रामनगर, संजय गांधी नगर, राहुल नगर, गणेश नगर, खंडोबा टेकडी, आझाद नगर, सोनिया गांधी नगर, प्रेम नगर व आनंद नगर या ठिकाणी डोंगराळ परिसरात झोपडपट्टय़ा वसलेल्या आहेत.
अतिवृष्टीत दरडी कोसळण्याची, डोंगरावरून वाहत येणाऱया पाण्याच्या प्रवाहामुळे भूस्खलन होऊन घरांची पडझड होण्याची तसेच नाल्यांना पूर येण्याची शक्यता असल्यामुळे झोपडय़ा वाहून जाण्याच्या संभाव्य घटना घडू शकतात. त्यामुळे स्थलांतर न करता तेथेच राहणाऱया रहिवाशांची जबाबदारी त्यांची स्वतःची असेल. जीवित-वित्तहानीला पालिका जबाबदार नाही, अशी नोटीस बजावण्यात आली आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;