Netflix आता मोफत पाहता येणार; ‘या’ टेलिकॉम कंपनीच्या ग्राकांना मिळणार लाभ

Netflix आता मोफत पाहता येणार; ‘या’ टेलिकॉम कंपनीच्या ग्राकांना मिळणार लाभ

नेटफ्लिक्स वापरकर्त्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. वापरतकर्त्यांना चांगला अनुभव देण्याचा प्रयत्न नेटफ्लिक्सच्या माध्यामातून करण्यात येत आहे. याच पार्श्वभूमीवर टेलीकॉम कंपनी व्होडाफोन-आयडियाने (VI) पुढाकार घेत ग्राहकांच्या मनोरंजनामध्ये भर घालण्यासाठी नेटफ्लिक्ससोबत भागीदारीची घोषणा केली आहे.

नेटफ्लिक्स वापरकर्त्यांची वाढती संख्या पाहता व्होडाफोन आयडिया ही टेलिकॉम कंपनी ग्राहकांसाठी खास सुविधा आणण्याच्या तयारीत आहेत. नेटफ्लिक्ससोबत तशी भागीदारी झाल्याची घोषणा करण्यात आली आहे. या भागिदारी अंतर्गत नेटफ्लिक्स वापरकर्ते त्यांच्या आवडत्या डिव्हाइसवर म्हणजे मोबाईल, टॅब किंवा टीव्हीवर नेटफ्लिक्सच्या माध्यामातून चित्रपट किंवा वेबसीरीज पाहण्याचा आनंद घेऊ शकतात, अस व्होडाफोनने आपल्या निवेदनात म्हटल आहे.

व्होडाफोनने आपल्या निवेदनात म्हंटल्यानुसार, सध्या प्री-पेड ग्राहकांसाठी नेटफ्लिक्स ऑफर सुरू करणार आहे. नेटफ्लिक्स लवकरच बंडल पोस्टपेड प्लॅन लॉन्च करणार आहे. ग्राहकांच्या मनोरंजनासाठी कंपनीने दोन नवीन प्री-पेड पॅक सादर केले आहेत. या पॅकमध्ये नेटफ्लिक्स बेसिक सबस्क्रिप्शनसह अमर्यादित कॉल आणि डेटा ग्राहकांना वापरता येणार आहे. विशेष म्हणजे या पॅकमध्ये वापरकर्त्यांना मोबाईल आणि टीव्हीवर नेटफ्लिक्स पाहण्याचा आनंद घेता येणार आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;