Lok Sabha Election 2024 : ‘इंडिया’ आघाडी जिंकताच 48 तासांत PM बनवू; काँग्रेस नेत्याने सांगितला फॉर्म्युला

Lok Sabha Election 2024 : ‘इंडिया’ आघाडी जिंकताच 48 तासांत PM बनवू; काँग्रेस नेत्याने सांगितला फॉर्म्युला

लोकसभा निवडणुकीच्या अखेरच्या टप्प्यातला प्रचार आज संपला. आता येत्या शनिवारी 1 जूनला मतदान होणार आहे. त्यानंतर 4 जूनला मतमोजणी होऊन निकाल लागणार आहे. यामुळे आता सर्वांचं लक्ष हे निकालाकडे लागलं आहे आणि त्याच बरोबर धाकधूकही वाढली आहे. अशातच काँग्रेसच्या एका वरिष्ठ नेत्याने मोठी माहिती दिली आहे. लोकसभा निवडणुकीत ‘इंडिया’ आघाडीला पूर्ण बहुमत मिळेल आणि त्यानंतर 48 तासांच्या आत पंतप्रधानाची निवड केली जाईल. आघाडीत ज्यांच्या जास्त जागा ते पंतप्रधानपदाचे अधिक दावेदार असतील, असे काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश म्हणाले.

लोकसभा निवडणुकीच्या सातव्या आणि अखेरच्या टप्प्यातील प्रचाराच्या शेवटच्या दिवशी काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी पीटीआय या वृत्तसंस्थेला मुलाखत दिली. ‘इंडिया’ आघाडीला 272 हून अधिक जागा मिळतील, असा विश्वास जयराम रमेश यांनी व्यक्त केला.

‘इंडिया’ आघाडीचे सरकार आल्यावर एनडीएतील घटक पक्षही आघाडीत सहभागी होऊ शकतात. पण त्यांचा समावेश करायचा की नाही? याचा निर्णय काँग्रेस हायकमांड घेईल. निवडणुकीच्या निकालानंतर नितीशकुमार आणि टीडीपीचे चंद्राबाबू नायडू यांच्यासारख्या एनडीएतील पक्षांसाठी दरवाजे खुले असतील का? असा प्रश्न जयराम रमेश यांना विचारण्यात आला.

नितीशकुमार पलटी मारण्यात माहिर आहेत. चंद्राबाबू नायडू हे 2019 मध्ये काँग्रेससोबत आघाडीत होते. ‘INDIA’ आणि NDA मध्ये दोन आयचे अंतर आहे. I फॉर इंसानियत आणि I फॉर इमानदारी. ज्या पक्षांमध्ये इमानदारी आणि इंसानियत आहे पण ते NDA मध्ये आहेत त्यांचाच ‘इंडिया’ आघाडीत समावेश होईल. जनतेचा जनादेश मिळाल्यानंतर स्थापन होणारं सरकार हे हुकूमशाही नाही तर जनतेचं असेल, असे जयराम रमेश म्हणाले.

‘आम्हाला स्पष्ट आणि निर्णायक जनादेश मिळेल’

मी संख्येवर बोलणार नाही. मात्र आम्हाला (‘इंडिया’ आघाडी) स्पष्ट आणि निर्णायक बहुमत मिळेल. 273 चे स्पष्ट बहुमत मिळेल. पण हे निर्णायक नाही. तर स्पष्ट आणि निर्णायक म्हणजे 272 हून खूप अधिक जागा. 2004 च्या निकालांचा कित्ता 2024 ला पुन्हा गिरवला जाईल. काँग्रेसला राजस्थान, कर्नाटक, तेलंगण आणि महाराष्ट्रमध्ये अधिक जागा मिळतील, असा विश्वासही जयराम रमेश यांनी व्यक्त केला.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;