हडोळती येथे जमावाच्या मारहाणीत तरुणाचा मृत्यू, मृतासह 11 जणांवर गुन्हा दाखल
अहमदपुर तालुक्यातील मौजे हडोळती येथे हातात फोडलेली दारूची बाटली आणि लोखंडाचा रॉड घेऊन हॉटेलमध्ये बसलेल्या लोकांना मारहाण करणाऱ्या इसमाचा लोकांनी केलेल्या मारहाणीत गंभीर जखमी होऊन मृत्यू झाल्याची घटना घडली. या प्रकरणी परस्पर विरोधी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. मृतावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या खून प्रकरणी तक्रारदार चंद्रभागाबाई नागोराव काळगीरे यांनी दिलेल्या तक्रारीत नमूद केले आहे की, त्यांचा मुलगा मृत दिलीप उर्फ विलास नागोराव काळगीरे यांना 11 जणांनी हाडोळती येथे दि. 29 मे रोजी सकाळी 8 च्या सुमारास मारहाण करून जखमी केले . मगदुमचा भाऊ, युनूस शर्दुल शेख, माधव पवार, रवी बालाजी मुळके, सत्तार बागवान, प्रदीप नायने, वाहिद फकीर, मंजूर शेख, मजीद मेकॅनिक, शकील सिराज, मिस्त्री शेख आणि दिपार खाजा हे सर्वजण राहणार हाडोळती यांनी व इतरांनी मिळून मुलाच्या तोंडावर, अंगावर मिरची पावडर टाकून, दोरीने बांधून, काठ्याने मारहाण केली. हातपाय बांधून ठेवले. त्यानंतर फिर्यादी व त्यांच्या जखमी झालेल्या मुलाला ऑटोत बसवून सरकारी दवाखाना अहमदपूर येथे उपचारासाठी पाठविले. तिथून पुढील उपचारासाठी लातूर येथील सरकारी दवाखान्यात पाठविले होते . उपचार सुरू असतानाच दिलीप उर्फ विलास नागोराव काळगीरे हा मरण पावला. या प्रकरणी 11 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान बालाजी लक्ष्मण मुळके वय 55 वर्षे रा.हाडोळती यांनी दिलेल्या तक्रारीत नमूद केले आहे की, हॉटेलवर चहा पिण्यासाठी गेले होते. बरेच लोक चहा पिण्यासाठी बसले होते दिलीप उर्फ विलास नागोराव काळगीरे रा. हाडोळती हा दारूची फोडलेली बाटली व लोखंडी रॉड घेऊन आला. फिर्यादींच्या मुलास बाटलीने मारत असताना ते सोडवण्यासाठी गेले असतांना रॉडने त्यांच्या हातवर मारुन हात मोडून जखमी केले. या प्रकरणी मृत दिलीप उर्फ विलास नागोराव काळगीरे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List