अठरा वर्षांनी न्यू इंग्लिश स्कूल गोधेगाव’ च्या विद्यार्थ्यांची भरली शाळा, उत्साहात स्नेह मेळावा साजरा
रविवारी दिनांक 26मे रोजी वेळ सकाळी 10.30 वाजताची, न्यू इंग्लिश स्कूल गोधेगावमध्ये विद्यार्थ्यांची मोठी लगबग सुरू होती. एकामागून एक विद्यार्थी जमा होत होते. मात्र आज त्यांच्या पाठीवर दप्तर नव्हते… ना होमवर्क किंवा लेक्चरचे टेन्शन… युनिफॉर्मचेही टेन्शन नसल्याने प्रत्येकजण आपल्याला आवडत्या पेहरावात शाळेत हजर झाले होते. चेहऱ्यावर फक्त आनंद ओसंडून वाहत होता… निमित्त होते ते स्नेह मेळाव्याचे. तब्बल 18 वर्षांनंतर शाळेतील मित्र-मैत्रिणींना भेटण्याचे…
2006 च्या बॅचचे दहावी’चे विद्यार्थी तब्बल 18 वर्षांनी एकत्र आले. गुरूजनांच्या उपस्थितीत विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहात स्नेह मेळावा अर्थात गेट टुगेदर साजरा झाला. अध्यक्षस्थानी विद्यालयाचे माजी सहशिक्षक दाभाडे एम व्ही होते. कार्यक्रमाचा शुभारंभ सुरुवात दीप प्रज्वलन व महाराष्ट्रगीत व राष्ट्रगीताने झाला. यानंतर दिवंगत विद्यार्थी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना अभिवादन करून पुढील कार्यक्रम सुरू झाला. शाळा भरल्याप्रमाणे विद्यार्थ्यांनी स्वतःची ओळख करून देत आपण शिक्षक, वकील, पोलिस, खासगी व्यवसाय, खासगी कंपन्या, सरकारी क्षेत्र, पत्रकारिता, शेती अशा कार्यक्षेत्रात नाव कमावल्याचे सांगितले. याचा उपस्थित शिक्षकांनी गौरव करीत आपल्या विद्यार्थ्यांचा अभिमान वाटत असल्याचे सांगत विद्यार्थ्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप दिली. प्रत्येकाने आपापल्या क्षेत्रात प्रामाणिकपणे आणि आनंदाने काम करा, यशस्वी व्हा, प्रकृतीची काळजी घेऊन सुखाने-आनंदाने जीवन जगा असा आशीर्वादही सर्व शिक्षकांनी मार्गदर्शनपर भाषणात विद्यार्थ्यांना दिला. दरम्यान, स्नेह मेळाव्याच्या निमित्ताने विद्यार्थ्यांनी सुमारे १ लाख रुपयांची देणगी शाळेला देण्याचेही जाहीर करण्यात आले.
दाभाडे एम. व्ही. यांचे शिवाजी शिरसाठ व चिंतामण भोकरे यांनी शाल व श्रीफळ देवुन सत्कार करण्यात आला. त्यानंतर निवृत्त शिक्षक साळवे सर, प्रशांत कोळसे व खटकाळे सतीश सर , पाटील सर यांचा रमेश दुशिंग व शैलेश रांधवणे, पंडोरे सर यांचा संतोष टूपके व रवींद्र खिल्लारी, दाभाडे आर. जी. निंबाळकर सर प्राचार्य जुंदारे सर वाबळे सर, शिंदे सर, गोरे मामा यांचा सत्कार विद्यार्थ्यांनी केला
हा स्नेह संमेलन आयोजन सर्जेराव भुजाडे , गणेश भोकरे , शिवाजी शिरसाठ , अनिल गायकवाड, रमेश दुशिंग, चिंतामण भोकरे, गणेश नेहरे,संतोष टुपके व रोहिणी शिंदे , निलम शिंदे यांनी केले.
पुरूषोत्तम टूपके, संदीप वाकचौरे, राजेंद्र कारभार, भारत आहेर, रवींद्र खिल्लारी, चंद्रकांत खिल्लारी, वैभव नवले, बाळू कोळसे, विकास गायकवाड, प्रदीप रांधवणे तसेच मुलींमध्ये माधुरी गायके, वैशाली जाधव, तब्बसुम शेख, जयश्री शिरसाठ, मंजुषा उकिरडे, जयश्री मलिक, देवयानी कुलकर्णी यासह सर्व माजी विद्यार्थ्यांचे मोलाचे सहकार्य लाभले. स्नेहभोजनाने कार्यक्रमाची सांगता झाली.
सूत्रसंचालन सर्जेराव भुजाडे यांनी केले . संदीप शिरसाठ व गणेश भोकरे यांनी प्रास्ताविक केले.शेवटी निलम शिंदे हिने सर्वांचे आभार मानले.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List