अभिनेता सनी देओलवर फसवणुकीचा आरोप; निर्मात्याकडून घेतले होते अडीच कोटी रुपये

अभिनेता सनी देओलवर फसवणुकीचा आरोप; निर्मात्याकडून घेतले होते अडीच कोटी रुपये

‘गदर 2’च्या जबरदस्त यशानंतर अभिनेता सनी देओल पुन्हा एकदा निर्मात्यांच्या पसंतीस उतरला आहे. सध्या सनी त्याच्या अनेक चित्रपटांवर काम करत असून प्रेक्षक त्यांच्या चित्रपटाच्या रिलीजची आतुरतेने वाट पाहत आहेत. दरम्यान, पुन्हा एकदा सनी देओलचे नाव चर्चेत आले आहे. मात्र, यावेळी तो त्याच्या चित्रपटांमुळे नाही तर निर्मात्याची फसवणूक केल्यामुळे चर्चेत आहे.

अलीकडेच चित्रपट निर्माता सौरव गुप्ता यांनी सनी देओलवर फसवणूक आणि घोटाळा केल्याचा आरोप केला आहे. ‘अभिनेत्याने एका चित्रपटासाठी त्याच्याकडून कोट्यवधी रुपये घेतले. परंतु जेव्हा चित्रपट करण्याची वेळ आली तेव्हा त्याने काम केले नाही’, असा गंभीर आरोप निर्मात्याने केला आहे. गेल्या आठवड्यात सौरव गुप्ताने एक पत्रकार परिषदही घेतली होती. 2016 मध्ये त्याने एका चित्रपटासाठी सनी देओलसोबत करार केला होता. पण सनी आपल्या बोलण्यावर ठाम राहिला नाही, असा दावा सौरव गुप्ता याने त्यावेळी केला.

सनी देओलसोबत 2016 मध्ये करार केला होता. त्याला एका चित्रपटात काम करायचे 4 कोटी रुपये मानधन दिले जाणार होते. दिग्दर्शक गुप्ता यांनी समी देओलला चित्रपटासाठी एक कोटी रुपये आगाऊ दिले होते. पण सनीने त्याच्या चित्रपटापूर्वी पोस्टर बॉईज हा चित्रपट करण्याचा निर्णय घेतला. मात्र त्यानंतर सनी गुप्ता त्याच्याकडे पैसे मागत राहिला. आतापर्यंत आपण अभिनेत्याला 2.55 कोटी रुपये दिले आहेत, असे दिग्दर्शक सौरव गुप्ता यांनी सांगितले. सौरभ गुप्ता यांनी केलेल्या आरोपांवर सिनेनिर्माता सुनील दर्शन यांनी देखील सहमती दर्शवली आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;