Jammu Accident : बस 150 फूट दरीत कोसळून भीषण अपघात, 21 जणांचा मृत्यू

Jammu Accident : बस 150 फूट दरीत कोसळून भीषण अपघात, 21 जणांचा मृत्यू

जम्मूमध्ये भीषण अपघात झाल्याची घटना घडली आहे. चालकाचे नियंत्रण सुटून यात्रेकरूंनी भरलेली बस रस्त्याच्या कडेवरुन घसरली आणि 150 फूट खोल दरीत कोसळली. या अपघातात 21 यात्रेकरूंचा मृत्यू झाला आहे. ही बस उत्तर प्रदेशमधील हाथरस येथून जम्मू-काश्मीरच्या रियासी जिल्ह्यातील शिव खोरीकडे जात होती. चोकी चोरा परिसरातील टांगली वळणावर हा अपघात झाला.

पीटीआय वृतसंस्थेनुसार, हा भीषण अपघात राजौरी जिल्ह्यात घडला आहे. अधिकाऱ्यांना सांगितले की, पोलीस आणि स्थानिक लोकांच्या मदतीने रेस्क्यू ऑपरेशन सुरु केला आहे. जखमींना अखनूर रुग्णालय आणि जम्मूच्या सरकारी मेडीकल कॉलेज रुग्णालयात भरती करण्यात आले आहे.

अपघातानंतर घटनास्थळी एकच गोंधळ उडाला. लोकं ओरडू लागले. घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. माहिती मिळताच एनडीआरएफ आणि एसडीआरएफचे पथकही घटनास्थळी पोहोचले. पोलीस, नागरिक आणि एसडीआरएफ, एनडीआरएफने तातडीने बचावकार्य सुरू केले. जखमींना अखनूर येथील स्थानिक रुग्णालयात आणि जम्मूच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;