चाकरमानी परतीच्या प्रवासाला ! रत्नागिरी ते मुंबई खासगी बसचे तिकिट चक्क 1500 रूपये

चाकरमानी परतीच्या प्रवासाला ! रत्नागिरी ते मुंबई खासगी बसचे तिकिट चक्क 1500 रूपये

उन्हाळी सुट्टीचा हंगामा संपल्यामुळे चाकरमानी आता परतीच्या प्रवासाला लागेल असून मुंबई-गोवा महामार्गावर वाहतूक कोंडी होत आहे. वाहतूक कोंडीमुळे महामार्गावर गाड्यांच्या रांगाच रांगा लागत आहेत. त्यामुळे कडक उन्हात ही वाहतूक कोंडी प्रवाशांसाठी असह्य होत आहे. वाहतूक कोंडीकडे पोलिसांनी लक्ष द्यावे अशी मागणी प्रवासी वर्गाकडून होत आहे.

चाकरमानी परतीच्या प्रवासाला लागले आहेत. कोकण रेल्वेच्या सर्व गाड्यांची आरक्षणे फुल झाली आहेत. अशावेळी खासगी बस हा एकमेव पर्याय चाकरमान्यांसमोर उभा रहातो. खासगी बसवाल्यांनीही लूटमार सुरू केली आहे. रत्नागिरी ते मुंबई स्लीपर गाडीचे तिकिट चक्क 1500 रूपये आहे. नॉन-एसी चेअर चे तिकिट चक्क 900 रूपये आहे. या अवासवा तिकिट दराकडे प्रादेशिक परिवहन विभागाने लक्ष द्यावे अशी मागणी प्रवासी करत आहेत.

मुंबई-गोवा महामार्गाचे चौपदरीकरणाचे काम सुरू आहे. अशावेळी उन्हाळी सुट्ट्यांचा हंगामा संपल्यानंतर चाकरमानी पुन्हा मुंबईकडे परतू लागले आहे.कोकण रेल्वेच्या गाड्या फुल्ल असल्यामुळे चाकरमानी खासगी वाहनाने प्रवास करणे पसंत करतात. मात्र त्यामुळे मुंबई-गोवा महामार्गावर वाहनांची संख्या वाढली आहे.चिपळूण ते हातखंबा दरम्यान अनेक ठिकाणी मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम सुरू आहे.याकामामुळेही वाहतूकीला अडथळा होऊन वाहतूक कोंडी होत आहे.तसेच अवजड वाहने रस्त्यात आल्यावरही वाहतूक कोंडीचा सामना प्रवाशांना करावा लागत आहे.

सध्या कडक उन्हाळा सुरू असताना वाहतूक कोंडीमुळे प्रवाशांना प्रचंड त्रास सहन करावा लागतो.सुट्ट्या असल्यामुळे कोकणात येणाऱ्या खासगी ट्रॅव्हल्सचीही संख्या वाढली आहे.त्यामुळे रस्त्यावरची रहदारी वाढून वाहतूक कोंडी होत आहे.वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी पोलिसांनी पुढाकार घ्यावा अशी मागणी प्रवासी करत आहेत.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;