मतं मिळवण्यासाठी माझ्या तब्येतीसंदर्भात मोदींकडून उलटसुलट विधानं; नवीन पटनायक यांची सडकून टीका
Lok Sabha Election 2024: ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनाईक यांनी त्यांच्या प्रकृतीबद्दलच्या चर्चांना पूर्णविराम देत गुरुवारी सांगितलं की ते ‘पूर्णपणे बरे आहेत’ आणि त्याबरोबरच त्यांनी सांगितलं की ते गेल्या एक महिन्यापासून लोकसभा आणि राज्य विधानसभा निवडणुकांसाठी प्रचार करत आहेत.
ANI ला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी ‘पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निवडणूक सभांदरम्यान त्यांच्या तब्येतीबद्दल उलटसुलट बोलल्याबद्दल तोफाही डागली. ‘ते म्हणाले की मोदी निवडणुकीच्या सभांवेळी फक्त मतं मिळवण्याचा प्रयत्न करत होते’.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List