डी पी चोरांचा धुमाकूळ, कवठे येमाईत घोडनदी किनारी असलेली वीज रोहित्रे चोरली

डी पी चोरांचा धुमाकूळ, कवठे येमाईत घोडनदी किनारी असलेली वीज रोहित्रे चोरली

शिरूर तालुक्याच्या पश्चिम भागातील कवठे येमाई,सविंदणे या गावासह बेट भागात सुमारे वर्षभरापासून ट्रान्स्फॉर्मर (डीपी) चोरटयांनी सातत्याने वीज रोहित्रे चोरुन परिसरात अक्षरश: थैमान घातले आहे.तब्बल चारशेच्यावर रोहित्रे चोरी झाल्याचा अंदाज व्यक्त होत आहे. नुकतेच कवठे येमाई येथील घोडनदी किनारी असलेले बाफणा रोहित्र चोरीला गेले आहे.विद्युत रोहित्राच्या चोऱ्या थांबण्याऐवजी दिवसेंदिवस त्या वाढतच चालल्या आहेत.मागे चोरीस गेलेल्या रोहित्र चोऱ्यांचा तपास अद्याप लागला नसून चोऱ्या वाढतच चालल्यामुळे सर्वसामान्य शेतकरी,नागरिकांतून पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण होवू लागले आहे.

सध्या मे महिना अंतिम आठवड्यात असून पावसाचे दिवस सुरु व्हायचे असताना कडक उन्हाचा चटका बसत आहे. त्यातच कवठे येमाईत डीपी चोरांनी पुन्हा दणका दिल्याने या 100 केव्ही ट्रान्स्फार्मरवर अवलंबून असलेले शेतकरी पुरते हतबल झाले आहेत. कवठे येमाई तील बाफना रोहित्र चोरीला गेल्यामुळे ऐन उन्हाळ्यात उपलब्ध पाणी शेती पिकांना द्यायचे कसे ? व शेतकऱ्यांनी जगायचे कसे ? असा संतप्त सवाल तेथील शेतकरी करीत आहेत. शिरूर तालुक्यात चोरटयांनी जवळपास चारशे विद्युत रोहित्र चोरून महावितरण विभागाचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान केले आहे.विद्युत डी पी सातत्याने चोऱ्या होत असल्याने व ऐन उन्हाळ्यात शेतकऱ्यांना वेळेवर विद्युत रोहित्र मिळत नसल्याने कडक ऊन्हामुळे डोळ्यादेखत ऊस, मका, तरकारी पिके आदी शेतीमाल होरपळून शेतकरी अडचणीत आले आहेत. रोहित्र चोरीला गेल्यावर महिनो अन् महिने ते मिळत नाही. परंतु त्या काळातील त्याचेही बिल शेतकऱ्यांच्या माथी मारले जात आहे.यामुळे शेतकरी खूपच अडचणीत आला असून या चोरट्यांचा बंदोबस्त करण्यासाठी पोलिसांनी कडक पावले उचलली पाहिजेत अशी मागणी शेतकऱ्यांतून होत आहे.

लाखो रुपयांची कर्जे काढून शेती टिकविण्याचा,जागविण्याचा प्रयत्न करणाऱ्या शेतकऱ्यांचे अशा संकटाने आर्थिक कंबरडे मोडल चालले आहे.एक ट्रान्स्फार्मर फोडून त्यातील तांब्याच्या कॉईल चोरीला गेल्या ने वीज मंडळाचे सुमारे एक लाख रुपयांचे नुकसान होत असून कवठे येमाईची चोरीस गेलेली बाफना डीपी लवकरात लवकर देण्याचा प्रयत्न करू असे आश्वासन महावितरण शिरूरचे उपकार्यकारी अभियंता सुमित जाधव यांनी दिले आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;