मराठवाड्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना सरकारनं वाऱ्यावर सोडलं! विजय वडेट्टीवार यांचा घणाघात
मराठवाड्यातसह राज्यात भीषण दुष्काळी परिस्थिती निर्माण झालेली आहे, असं असताना राज्य आणि केंद्र सरकारनं दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडलं आहे, असा घणाघात विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी आज छत्रपती संभाजीनगर मध्ये सरकारवर केला आहे. दुष्काळी आढावा बैठकीकडे पाठ फिरवून राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे परदेशात थंड हवा खाण्यासाठी गेले आहेत असा आरोपही त्यांचा नामोल्लेख टाळून केला.
विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार आज गुरुवारी छत्रपती संभाजीनगर, जालना, जिल्ह्याच्या दुष्काळग्रस्त भागाच्या दौऱ्यासाठी शहरात आले असता ते प्रसार माध्यमांशी बोलत होते याप्रसंगी जिल्हाध्यक्ष डॉक्टर कल्याण काळे, कांचन कुमार चाटे आदींची उपस्थिती होती.
मराठवाड्यासह राज्यात भीषण दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. पिण्याच्या पाण्याची सोय नाही मजुराच्या हाताला काम नाही अशी गंभीर परिस्थिती असताना राज्याचे कृषिमंत्री येथील दुष्काळग्रस्त नागरिकांना वाऱ्यावर सोडून परदेशात गेले आहेत असा आरोप करून वडेट्टीवार पुढे बोलताना म्हणाले कृषिमंत्र्यांच्या बीड जिल्ह्यात सर्वाधिक शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत येथील शेतकऱ्यांना मदत करण्याऐवजी मंत्री त्याकडे दुर्लक्ष करीत आहेत. आढाव छत्रपती संभाजी नगर मध्ये आयोजित दुष्काळ आढावा बैठकीत पाच पालकमंत्री गैरहजर राहतात यातूनच त्यांची दुर्लक्ष वृत्ती दिसून येते सरकार हे टक्केवारी खाणारी आहे असा आरोपही त्यांनी केला. जलयुक्त शिवार योजना ही फसवी योजना असल्याची टिप्पणी ही त्यांनी यावेळी केली.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List