Delhi Excise Policy : मनीष सिसोदिया यांना दिलासा नाहीच, न्यायालयीन कोठडीत पुन्हा वाढ

Delhi Excise Policy : मनीष सिसोदिया यांना दिलासा नाहीच, न्यायालयीन कोठडीत पुन्हा वाढ

दिल्लीतील कथित मद्य घोटाळा प्रकरणात आम आदमी पक्षाचे (आप) नेते मनीष सिसोदिया यांना कोर्टाकडून दिलासा मिळालेला नाही. राउज एव्हेन्यू कोर्टाने गुरुवारी (30 मे) मनीष सिसोदिया आणि इतर आरोपींच्या न्यायालयीन कोठडीत 6 जुलैपर्यंत वाढ केली आहे. मनीष सिसोदिया यांना गेल्या वर्षी कथित मद्य धोरण घोटाळा प्रकरणात अटक करण्यात आली होती. यानंतर फेब्रुवारीमध्ये सिसोदिया यांना लखनऊमध्ये भाचीच्या लग्नात सहभागी होण्यासाठी तीन दिवसांसाठी जामीन मंजूर करण्यात आला होता.

मनीष सिसोदिया हे मद्य धोरण घोटाळा प्रकरणातील आरोपी आहेत. या प्रकरणाची केंद्रीय यंत्रणांमार्फत चौकशी सुरू आहे. सीबीआयने सिसोदिया यांना 2 फेब्रुवारी रोजी अटक केली होती. याप्रकरणात झालेल्या मनी लाँड्रिंगचा तपास ईडीकडून केला जात आहे. सिसोदीया 2 फेब्रुवारीपासून तुरुंगात आहेत. गेल्या दीड वर्षांपासून ते तुरुंगात असून त्यांनी गेल्या महिन्यात तुरुंगातूनच आपल्या पटपरगंज या मतदारसंघातील जनतेला पत्र लिहिले होते. यात त्यांनी ‘लवकरच बाहेर भेटूया’, असे म्हटले होते.

मद्य धोरण घोटाळाप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात झालेल्या सुनावणीदरम्यान ईडीने आम आदमी पार्टीला या प्रकरणात 17 मे रोजी आरोपी बनवले होते. दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आपचे संयोजक अरविंद केजरीवाल यांनी ईडीने केलेल्या अटकेला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. तसेच ईडीने केलेले सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. तसेच भाजप राजकीय सूडबुद्धीने आम आदमी पक्षाविरोधात कारवाई करत असल्याचा आरोप ‘आप’ने केला आहे.

तुरुंगात मनिष सिसोदिया, सत्येंद्र जैन यांना भाजपची ऑफर; CM केजरीवाल यांचं मोठं विधान

 

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;