जमीन हडपण्यासाठी संत्रे कुटुंबाला मारहाण, ही सत्तेची मस्ती; दानवेंवरील आरोपाची चौकशी करा! – विजय वडेट्टीवार

जमीन हडपण्यासाठी संत्रे कुटुंबाला मारहाण, ही सत्तेची मस्ती; दानवेंवरील आरोपाची चौकशी करा! – विजय वडेट्टीवार

संत्रे कुटुंबाला केलेली मारहाण म्हणजे सत्तेचा माज आहे. एखाद्या गावात जमिनीवर नजर पडली तर ती जागा दानवे यांना दिली पाहिजे, असा दबाव सत्ताधारी खासदार, आमदार यांनी या कुटुंबावर टाकला. घर जबरदस्तीने पाडून कुटुंबाला मारहाण केली. गरीब बहुजन कुंभार समाजातील हे कुटुंब दिवस रात्र कष्ट करून आपला उदरनिर्वाह करत आहे. पण जमीन हडपण्यासाठी या कुटुंबाला त्रास दिला जातो, मारहाण केली जाते. भाजपवाल्यांना महाराष्ट्रात गुंडांचे राज्य आणायचे आहे का? पोलिस प्रशासन, महसूल प्रशासन काय करत आहे? असा सवाल वडेट्टीवार यांनी आज उपस्थित केला आहे. गरीब कुटुंब आहे म्हणून त्रास देता पण या संत्रे कुटुंबाला न्याय देण्यासाठी आम्ही प्रयत्न करू विधान सभेत आवाज उठवू, असा इशारा विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी दिला.

जवखेडा गावात, केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे आणि आमदार संतोष दानवे यांच्या कार्यकर्त्यांनी मारहाण करून घर उध्वस्त केल्याचा गंभीर आरोप संत्रे कुटुंबियानी केला आहे. राष्ट्रीय महाहामार्ग बनवण्यासाठी नियमाचं उलंघन करून घर उध्वस्त केल्याचा देखील संत्रे कुटुंबाचा आरोप आहे. उध्वस्त घराचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. या अन्यायग्रस्त संत्रे कुटुंबाची जवखेडा येथे श्री.वडेट्टीवार यांनी भेट घेतली. यावेळी घडलेल्या घटनेची माहिती घेऊन संत्रे कुटुंबाला न्याय मिळवून देण्यासाठी कटिबद्ध असल्याचे त्यांनी सांगितले.

वडेट्टीवार म्हणाले की, जवखेडा गावातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 753, एम.साठी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे आणि आमदार संतोष दानवे यांच्या कार्यकर्त्यांनी कुंभार समाजाच्या संत्रे कुटुंबाला मारहाण केली. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना हाताशी धरून नियमबाह्य पद्धतीने घर उध्वस्थ केले असा, आरोप पीडित संत्रे कुटूंबानी केला आहे. अज्ञात आठ ते दहा जणांनानी रात्रीच्या सुमारास घरात घुसून मारहाण करत घर उध्वस्थ केल्याची घटना केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्या गावात घडली आहे. जवखेडा गावातील कुंभार समाजाच्या संत्रे कुटुंबियांनी सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल करून न्याय मिळावा मागणी केली आहे. या प्रकारणी हसनाबाद पोलिस ठाण्यात लेखी तक्रार दाखल केली आहे .या तक्रारीच्या आधारे हसनाबाद पोलिसांनी आज्ञात आठ ते दहाजणा विरुद्ध संत्रे कुटूंबियांना मारहाण करून त्यांचं घर उध्वस्थ केल्या प्रकारणी रात्री उशिरा गुन्हा दाखल केला आहे. परंतु हा तपास समाधानकारक नाही.

महायुतीच्या अपयशी कारभारामुळे मराठवाड्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्या सुरूच! – विजय वडेट्टीवार

वडेट्टीवार म्हणाले, हाय वे जात असताना स्वतःच्या जमिनी, घर वाचवायचे पण दुसऱ्यांची जमीन घ्यायची ही सत्तेतील मस्ती आहे. आम्ही ही मस्ती उतरवणार. संत्रे कुटुंबाच्या पाठीशी आम्ही उभे आहोत. यांचे संरक्षण करण्याची जबाबदारी पोलिसांची आहे.या कुटुंबाला काही झालं तर रावसाहेब दानवे आणि त्यांचे कुटुंब याला जबाबदार ठरेल. संत्रे कुटुंबाने दानवे यांचे नाव घेतले आहे. त्यांच्यावर गुन्हा दखल करून चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी वडेट्टीवार यांनी केली आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;