तरुणाला रक्तबंबाळ होईपर्यंत मारहाण, भाजपच्या माजी आमदारासह मुलावर आणि अन्य 5 जणांवर गुन्हा दाखल
उत्तर प्रदेशमधील बलिया येथील भाजपचे माजी आमदार, त्यांचा मुलगा आणि अन्य 5 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 29 मे रोजी पेट्रोल पंपावर किरकोळ वादातून आपल्यावर हल्ला केल्याचा आरोप करनछपरा गावचा रहिवासी संतोष कुमार सिंह याने केला आहे. यानंतर पोलिसांनी भाजपचे माजी आमदार सुरेंद्र सिंह, त्यांचा मुलगा विद्या भूषण सिंह आणि अन्य 5 जणांवर गुन्हा दाखल करत तपास सुरू केला आहे.
डोकटी पोलीस स्थानकाचे अधिकारी धर्मवीर सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार, तरुणाच्या तक्रारीनंतर सर्व आरोपींच्या विरोधात कलम 308, 147, 323 आणि 506 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. भाजपच्या ज्या माजी आमदारावर गुन्हा दाखल झाला आहे ते सुरेंद्र सिंह 2017 च्या विधानसभा निवडणुकीत बैरिया येथून निवडून आले होते. मात्र 2022 ला पक्षाने त्यांचे तिकीट कापले होते. सध्याही ते पक्षात सक्रिय आहेत.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List