Liquor Policy Case : अरविंद केजरीवाल यांची राउज एव्हेन्यू कोर्टात धाव, जामिनात वाढ करण्यासाठी याचिका दाखल
कथित मद्य धोरण घोटाळा प्रकरणात अंतरिम जामिनाचा कालावधी वाढवण्यासाठी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी सुप्रीम कोर्टात याचिका केली होती. पण मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या याचिकेवर सुनावणी करण्यास सुप्रीम कोर्टाने नकार दिला. यानंतर आता मुख्यमंत्री केजरीवाल यांनी दिल्लीतील राउज एव्हेन्यू कोर्टात धाव घेतली आहे. आता या प्रकरणी दुपारी दोन वाजता सुनावणी होण्याची शक्यता आहे.
सुप्रीम कोर्टाने मुख्यमंत्री केजरीवाल यांना 1 जूनपर्यंत अंतरिम जामीन मंजूर केला आहे. त्यानंतर CM केजरीवाल यांनी वैद्यकीय कारणास्तव जामिनात आणखी 7 दिवसांची वाढ करावी, अशी विनंती करणारी याचिका सुप्रीम कोर्टात केली होती. पण सुप्रीम कोर्टाने सुनावणीस नकार दिला. आता मुख्यमंत्री केजरीवाल यांनी जामिनासाठी कनिष्ठ न्यायलायत धाव घेतली आहे. दिल्लीतील राउज एव्हेन्यू कोर्टात त्यांनी जामिनात वाढ करण्यासाठी याचिका केली आहे.
दरम्यान, अरविंद केजरीवाल यांच्या अटकेला अव्हान देणाऱ्या याचिकेवरील निर्णय 17 मे रोजी सुप्रीम कोर्टाने राखून ठेवला आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List