अभिनेत्याने भर स्टेजवर प्रसिद्ध अभिनेत्रीला मारला धक्का, नेमकं काय घडलं?

अभिनेत्याने भर स्टेजवर प्रसिद्ध अभिनेत्रीला मारला धक्का, नेमकं काय घडलं?

तेलुगू सुपरस्टार नंदमुरी बालकृष्ण कायम कोणत्या कोणत्या कारणासाठी चर्चेत असतात. कधी सिनेमासाठी तर कधी अन्य कारणामुळे ते लाइमलाइटमध्ये असतात. सध्या सोशल मीडियावर त्यांचा एक व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत असून त्यात ते अभिनेत्री अंजलीला धक्का देताना दिसले, त्यावरुन आता नेटकरी संतापले असून त्यांना प्रचंड ट्रोल केले जाते आहे.

व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये नंदमुरी बालकृष्ण फिल्म ‘गॅग्स ऑफ गोदावरी’च्या इव्हेण्ट दरम्यान स्टेजवर चालताना दिसत आहेत. दरम्यान स्टेजवर बरेच जण आधीच उपस्थित होते. त्यावेळी तेथे अभिनेत्री अंजलीही होती. दरम्यान नंदमुरी अंजलीला म्हणतात की, स्टेजवर थोडी जागा करते, अंजलीने तिच्यासोबत उभी असलेल्या नेहा शेट्टीसोबत जागा देत होती. मात्र साडी नेसल्यामुळे ती अलगद चालत होती. तेव्हाच नंदमुरी बालकृष्ण यांनी तिला धक्का दिला. नंदमुरींनी अचानक असा धक्का दिल्याने तिचे संतुलन बिघडते. नंदमुरींच्या या कृत्याने आधीतर तिला धक्का बसतो मात्र त्यानंतर ती हसायला लागते. नंतर ती नेहा शेट्टीचा हात पकडते. त्यावेळी नंदमुरी दोघींना काहीतरी सांगताना दिसत आहेत. त्यावेळीही अंजली हसताना दिसत आहे. हा व्हिडीओ सोशल मीडीयावर तुफान व्हायरल होत आहे आणि नंदमुरी बालकृष्ण यांनी एका महिलेसोबत केलेल्या या कृत्याने प्रचंड ट्रोल केले जात आहे.

दरम्यान त्यावेळी अंजलीने त्यांचे हे कृत्य हसण्यावर नेत टाळले. मात्र तिच्या चाहत्यांना मात्र प्रचंड राग आला. एका युजरने ‘ही कोणती पद्धत आहे’, दुसऱ्याने लिहीले, ‘किमान वयाचे तरी भान ठेवायचे’, अन्. एकाने लिहीले, ‘एका हुशार अभिनेत्रीसोबत असे वर्तन तर अन्य. एकाने लिहीले तुम्हाला लाज वाटली पाहिजे. अभिनेत्री अंजलीबद्दल बोलायचे झाले तर तिने दक्षिणेतील अनेक हिट सिनेमे दिले आहेत. ज्यामध्ये ‘इंगायम अप्पोत्तम’, ‘गीतांजली’, ‘सीथम्मा वकितलो सिरिमल्ले चेट्टू’, ‘अंगडी थेरू’ इत्यादींमध्ये दिसली आहे. नंदामुरी बालकृष्ण हे दक्षिण हिंदुस्थानातील ज्येष्ठ अभिनेते असून ते राजकारणातही सक्रिय आहेत.

हा व्हिडिओ समोर आल्यानंतर चित्रपट निर्माते हंसल मेहता यांनीही नंदामुरी बालकृष्णा यांचा व्हिडिओ त्यांच्या एक्स अकाउंटवर शेअर केला आहे. व्हिडीओ शेअर करताना त्यांनी लिहिले की – ‘हा बदमाश कोण आहे?’

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;