दहावी, बारावीनंतर करीअरच्या दिशा
दहावी, बारावीच्या निकालानंतर पुढील प्रवेशासाठी विद्यार्थ्यांची लगबग सुरू झाली आहे. विद्यार्थ्यांना कला, वाणिज्य, विज्ञान या पारंपरिक शाखेशिवाय करीअरच्या अन्य दिशाही उपलब्ध आहेत. आपल्या आवडीनुसार विद्यार्थी करीअरचा अचूक पर्याय निवडू शकतात. विद्यार्थ्यांना अभियांत्रिकीसह विधी, डीएड, फार्मसी अशा विविध अभ्यासक्रमांत करीअर घडविण्याची उत्तम संधी आहे. बारावीनंतर विद्यार्थ्यांना जिओग्राफिकल सर्व्हे ऑफ इंडियामध्ये सर्व्हेअर म्हणून संधी मिळू शकते.
- बीबीए, बीबीएम, बीसीए
कालावधी – तीन वर्षे
प्रवेश – सीईटी किंवा गुणवत्ता यादीनुसार
- फॉरेन लंग्वेज
बेसिक, सर्टिफिकेट किंवा इतर कोर्सेसवर आधारित तांत्रिक शिक्षण
- इंजिनीअरिंग डिप्लोमा
कालावधी – तीन वर्षे
पात्रता – बारावी विज्ञान, थेट दुसऱया वर्षात प्रवेश
- बीई
कालावधी – चार वर्षे
पात्रता – बारावी विज्ञान, सीईटी किंवा गुणवत्तेनुसार
- ऑटोमोबाईल
कालावधी- चार वर्षे
पात्रता – बारावी विज्ञान, सीईटी किंवा गुणवत्तेनुसार
- टूल अॅण्ड डाय मेकिंग
कालावधी – चार वर्षे
पात्रता – दहावी-बारावी पास
- डिप्लोमा इन प्लॅस्टिक मोल्ड टेक्नॉलॉजी
कालावधी – तीन वर्षे
पात्रता – बारावी (किमान 70 टक्के)
- बीएससी इन नार्ंसग
कालावधी – चार वर्षे
पात्रता – बारावी शास्त्र, नीट उत्तीर्ण
- बीव्हीएससी अॅण्ड एएच
कालावधी – पाच वर्षे
पात्रता – बारावी विज्ञान, नीट
एअरपर्ह्स, नेव्हीतील करीअर
पेंद्रीय लोकसेवा आयोग (यूपीएससी)-मार्फत वर्षातून एनडीए (1) आणि एनडीए (2) अशा दोनवेळा लेखी परीक्षा होतात. एअरपर्ह्स व नौदलासाठी जे उमेदवार राज्य शिक्षण मंडळाची किंवा मान्यताप्राप्त विद्यापीठाची बारावी परीक्षा भौतिकशास्त्र, गणित या विषयांसह उत्तीर्ण आहेत किंवा त्या परीक्षेस बसले आहेत, असे उमेदवार परीक्षेसाठी पात्र आहेत. त्यासाठी साडेसोळा ते 19 वर्षांपर्यंतचे उमेदवार अर्ज करू शकतात.
महत्त्वाच्या वेबसाईट्स
अभियांत्रिकी, वास्तुशास्त्र, औषधनिर्माणशास्त्र, हॉटेल मॅनेजमेंट प्रवेशासाठी www.dte.org.in
वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन www.dmer.org
व्यवसाय शिक्षण आणि प्रशिक्षण www.dvet.org.in
आयआयटी, जेईई www.iitb.ac.in
केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ www.aipmt.nic.in
केंद्रीय लोकसेवा आयोग www.upsc.gov.in
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List