मेजर राधिका सेन यांचा संयुक्त राष्ट्राकडून गौरव
हिंदुस्थानी लष्करातील मेजर राधिका सेन यांना प्रतिष्ठत जेंडर अॅडव्होकेट पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. कांगोमध्ये संयुक्त राष्ट्र (यूएन) मिशनमध्ये सेवा बजावलेल्या हिंदुस्थान महिला शांती रक्षक मेजर राधिका सेन यांना सैन्य पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. 30 मे रोजी आंतरराष्ट्रीय संयुक्त राष्ट्र शांती संरक्षण दिवसानिमित्त मेजर राधिका सेन यांना ‘2023 युनायटेड नॅशन मिलिट्री जेंडर अॅडव्होकेट ऑफ द ईयर अवॉर्ड’ने सन्मानित केले जाणार आहे. संयुक्त राष्ट्राचे महासचिव गुटेरेस यांच्या हस्ते हा पुरस्कार दिला जाणार आहे. मेजर सेन या हिंदुस्थानी त्वरित तैनाती बटालियनच्या कमांडर म्हणून मार्च 2023 ते एप्रिल 2024 पर्यंत कांगो गणराज्यच्या पूर्वेत तैनात होत्या. त्या मूळच्या हिमाचल प्रदेशच्या आहेत. त्यांचा जन्म 1993 मध्ये झाला. आठ वर्षांपूर्वी त्या हिंदुस्थानी लष्करात दाखल झाल्या.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List